Varun Chakravarthy: Chase and threatening calls from the airport; Mystery spinner Varun Chakravarthy's 'those' terrifying days
Varun Chakravarthy : भारताने नुकतीच चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका वठवणारा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने आपल्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्याला धमकीचे फोन कॉल्स आले तसेच विमानतळावरून पाठलागहि करण्यात आल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले. वास्तविक पहाता ही घटना 2021 टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर घडली होती. ही स्पर्धा चार वर्षांपूर्वी दुबईत आयोजित करण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरुण चक्रवर्तीने 2020 आणि 2021 इंडियन प्रीमियर लीग हंगामात कोलकाता नाइट रायडर्ससाठी चांगली कामगिरी केली होती. त्याने पहिल्या सत्रात 17 तर दुसऱ्या सत्रात 18 विकेट्स घेत आपली छाप पाडली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी खूपच वाईट झाली होती. भारतीय संघ पहिल्या फेरीतूनच बाहेर पडले होते. या संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या संघांकडून पराभव पत्करावा लागला होता. यामुळे टीम इंडियाला बाद फेरीत देखील स्थान मिळवता आले नव्हते.
वरुण चक्रवर्तीसाठीही ही स्पर्धा आठवण न ठेवण्यासारखी अशीच होती. वरुणने या स्पर्धेत केवळ तीन सामने खेळले होते आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. वरुणने या स्पर्धेनंतर चाहत्यांच्या प्रतिक्रियांबद्दल माहिती दिली आहे. त्याने सांगितले की त्याला धमकीचे फोन आले होते तसेच विमानतळावर त्याचा पाठलाग करण्यात आला होता. इतकेच नाही तर त्याच्या घराचाही शोध घेण्यात आला होता. असे वरुणने सांगितले. झडती घेण्यात आली होती. .
वरुण चक्रवर्तीने यूट्यूबवरील एका पॉडकास्टमध्ये संवाद साधला, त्यावेळी तो बोलत होता. त्याने सांगितले की, 2021 चा विश्वचषक माझ्यासाठी वाईट राहिला आहे. त्यावेळी मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मी खूप अपेक्षा घेऊन संघात सामील झालो होतो. पण, एकही विकेट घेऊ शकलो नाही. तो पुढे म्हणाला की, यानंतर तीन वर्षे संघातील निवडीसाठी माझा विचार देखील करण्यात आला नाही.
हेही वाचा : कधी आणि कुठे पाहता येणार WPL 2025 चा फायनलचा सामना? दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स असणार आमनेसामने
चक्रवर्तीने पुढे म्हणाला की, 2021 च्या T20 विश्वचषकानंतर, मी भारतात येण्यापूर्वीच मला धमकीचे फोन येऊ लागले होते. मी भारतात येण्याचा प्रयत्न केला तर मी येऊ शकणार नाही अशी परिस्थिति होती. त्यांनी माझ्या घराचा देखील पत्ता देखील शोधून काढला होता. तसेच तो म्हणाला की, विमानतळावरून येताना मला दिसले की लोक बाइकवरून माझ्या मागे येत आहेत. पण मी समजू शकतो की चाहते खूप भावूक होत असतात.