Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badminton: थ्रिलर फायनल! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत नाडगोंडे रेव्हन्सचा दणकेबाज विजय

Badminton: मिश्र दुहेरीच्या निर्णायक सामन्यात रेव्हन्सच्या रिआन करंदीकर व सारा नवरे यांनी तन्मय चोभे व नेहा लागू यांचा १५-०७, १२-१५, १५-१० असा पराभव केला. या विजयासह रेव्हन्सने अंतिम सामना ४-३ असा जिंकत स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 14, 2026 | 09:45 PM
pyc hindu gymkhana

pyc hindu gymkhana

Follow Us
Follow Us:
  • नाडगोंडे रेव्हन्सला पीवायसी बॅडमिंटनचे विजेतेपद
  • अंतिम लढतीत बेल्फिन्स टायगर्सचा ४-३ असा पराभव
  • रिआन करंदीकर-सारा नवरेच्या विजयाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब
पुणे/Badminton: पीवायसी हिंदू जिमखानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत नाडगोंडे रेव्हन्स संघाने विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत रेव्हन्सने बेल्फिन्स टायगर्स संघाचा ४-३ असा पराभव करत करंडकावर नाव कोरले. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या अंतिम सामन्यात रेव्हन्सने सुरुवातीपासूनच चुरशीची लढत दिली. गोल्ड खुल्या दुहेरीच्या पहिल्या सामन्यात रेव्हन्सच्या प्रतीक धर्माधिकारी व केदार नाडगोंडे यांनी टायगर्सच्या ईशान लागू व निखिल चितळे यांचा १५-११, १५-१२ असा पराभव करत संघाला विजयी सुरुवात करून दिली.

ऑयानंतर खुल्या दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात टायगर्सच्या मिहिर विंझे व प्रीती सप्रे यांनी रेव्हन्सच्या मनीष शहा व प्रांजली नाडगोंडे यांचा १५-०३, १५-०७ असा पराभव करत सामना बरोबरीत आणला. प्रौढ दुहेरीच्या चौथ्या सामन्यात अमोद प्रधान व आनंद घाटे यांनी अविनाश दोशी व समीर सावला यांचा १६-१४, १७-१५ असा पराभव करत टायगर्सला आघाडी मिळवून दिली.

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार! बेल्फिन्स टायगर्स, वन लिटिल फार्म संघांची विजयी आगेकूच

कर्णा, यशची दमदार खेळी

प्रौढ दुहेरीच्या पाचव्या सामन्यात रेव्हन्सच्या चंद्रशेखर आपटे व विश्वास मोकाशी यांनी बाळ कुलकर्णी व परीक्षित देवल यांचा २०-१८, १५-०९ असा पराभव करत रेव्हन्सला पुन्हा बरोबरी साधून दिली. त्यानंतर खुल्या दुहेरीच्या सहाव्या सामन्यात टायगर्सच्या कर्णा मेहता व यश मेहेंदळे यांनी रेव्हन्सच्या आशय कश्यप व विनित राठी यांचा ११-१५, १६-१४, १५-१३ असा पराभव करत टायगर्सला पुन्हा आघाडी मिळवून दिली.खुल्या दुहेरीच्या सातव्या सामन्यात रेव्हन्सच्या चिन्मय चिरपुटकर व पृथ्वी शहा यांनी अभिषेक ताम्हाणे व तनिश बेलगलकर यांचा १५-१२, १५-०८ असा पराभव करत सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधली. त्यामुळे अंतिम सामन्याचा निकाल मिश्र दुहेरीच्या सामन्यावर अवलंबून राहिला.

करंडक व पदके देऊन गौरविले

मिश्र दुहेरीच्या निर्णायक सामन्यात रेव्हन्सच्या रिआन करंदीकर व सारा नवरे यांनी तन्मय चोभे व नेहा लागू यांचा १५-०७, १२-१५, १५-१० असा पराभव केला. या विजयासह रेव्हन्सने अंतिम सामना ४-३ असा जिंकत स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.विजेत्या नाडगोंडे रेव्हन्स संघाला करंडक व पदके देऊन गौरविण्यात आले. पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव दीपक गाडगीळ, सहसचिव सारंग लागू आणि ट्रूस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी उल्हास त्रिमल, मिस्टिक जंगलचे सोहम जोशी, क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, नंदन डोंगरे, अभिषेक ताम्हाणे, सिद्धार्थ भावे, शिरीष साठे, अमोद प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.

Badminton चा थरार! पीवायसी कोर्टवर रंगल्या अटीतटीच्या लढती; वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी

इतर पारितोषिक विजेते

सर्वोत्कृष्ट जोडी (गोल्ड दुहेरी) : केदार नाडगोंडे/प्रतीक धर्माधिकारी
सर्वोत्कृष्ट जोडी (सिल्वर दुहेरी) : कर्णा मेहता/यश मेहेंदळे
सर्वोत्कृष्ट जोडी (ब्राँझ दुहेरी) : अभिषेक ताम्हाणे/तनिश बेलगलकर
सर्वोत्कृष्ट जोडी (प्रौढ दुहेरी) : मकरंद चितळे/अनिल देडगे
सर्वोत्कृष्ट जोडी (मिश्र दुहेरी) : रिआन करंदीकर/सारा नवरे
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (पुरुष) : प्रतीक धर्माधिकारी/कर्णा मेहता
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (महिला) : सारा नवरे
प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (प्रौढ) : सिद्धार्थ साठे/हेमंत करमरकर
उदयोन्मुख खेळाडू : अन्वित राजवाडे
मॅच ऑफ द टूर्नामेंट : ईशान लागू/निखिल चितळे वि. अनिश राणे/कृष्णनिल गोरे

Web Title: Victory for nadgonde ravens team in pyc hindu gymkhana badminton league tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Badminton
  • PYC Hindu Gymkhana Club
  • Sports News

संबंधित बातम्या

एस. आर. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; बुद्धिबळ अन्  योगासनात १२ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1

एस. आर. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; बुद्धिबळ अन् योगासनात १२ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’
2

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’

Tennis: पहिले बळकावला अव्वल दर्जा, आता US Open मिळवले; Aryna Sabalenka ला हरवणारी Elena Rybakina कोण आहे
3

Tennis: पहिले बळकावला अव्वल दर्जा, आता US Open मिळवले; Aryna Sabalenka ला हरवणारी Elena Rybakina कोण आहे

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…
4

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.