फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
विदर्भ विरुद्ध मुंबई : भारताचा संघ बांग्लादेशविरुद्ध चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना खेळत आहे. तर दुसरीकडे सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यामध्ये सध्या विदर्भ विरुद्ध मुंबई यांच्यामध्ये सामना सुरु आहे. सध्या क्रिकेट चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळत आहे. सध्या विदर्भ विरुद्ध मुंबई यांच्यामध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सध्या सामना सुरु आहे. यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये विदर्भने ३८३ धावा ठोकल्या आहेत. तर मुंबईच्या संघाने २७० धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावांमध्ये विदर्भने १०९ ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून २९१ धावा केल्या आहेत. आता या सामन्यांमध्ये विदर्भाच्या नवा स्टार पाहायला मिळाला आहे. त्याने या सामन्याची मैफिल लुटली आहे.
विदर्भच्या संघाने पहिले पाच विकेट पटकन गमावले आणि त्यानंतर विदर्भातच संघ दुसऱ्या डावांमध्ये अडचणीत पाहायला मिळाला. आता विदर्भाचा नवा स्टार पाहायला मिळाला त्याने १५१ धावांची दमदार खेळी खेळली आणि चाहत्यांचे लक्ष्य वेधले आहे. विदर्भाने दुसऱ्या डावांमध्ये २९२ धावा केल्या आहेत, आता विदर्भाकडे ४०५ धावांची आघाडी आहे. पहिल्या डावांमध्ये डॅनिश मालेवरने ७९ धावांची खेळी खेळली, तर ध्रुव शोरेने धावांचा दमदार खेळ दाखवला.
150* for Yash Rathod. Scored 141 vs MP in the SF last season as well. pic.twitter.com/tg7boAaagf
— Mayank (@ImMayankB) February 20, 2025
करुण नायरने पहिल्या डावात ४५ धावा केल्या तर यश राठोडने ५४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावांमध्ये विदर्भ संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर दुसऱ्या सामन्यांमध्ये संघाने पहिले चार विकेट्स गमावले होते. त्यानंतर टीम विदर्भचा संघ अडचणीत होता. त्यानंतर विदर्भाचा यश राठोड आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी दमदार खेळ दाखवत चांगली पार्टनरशिप केली आणि संघाला अडचणीतुन बाहेर काढले.
मुंबईच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे पण तो विदर्भ विरुद्ध झालेल्या सामान्यांच्या पहिल्या डावात फार मोठी धावसंख्या करू शकला नाही. मुंबईच्या संघासाठी आकाश आनंदने १०६ धावांची दमदार खेळी खेळली. त्याव्यतिरिक्त कोणत्या फलंदाजाने ५० धावांचा टप्पा पार केला नाही.
गोलंदाजानाबद्दल बोलायचंय झालं तर पहिल्या डावांमध्ये शिवम दुबेने कमालीची कामगिरी केली त्याने ५ विकेट्स नावावर केले. तर रॉयस्टन डायस आणि शम्स मुलांनी या दोघांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले. शार्दूल ठाकूरच्या हाती पहिल्या डावात १ विकेट लागला. विदर्भ संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर संघाने पार्थ रेखाडेने ४ विकेट्स नावावर केले तर यश ठाकूर आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले आहेत. नचिकेत भुते आणि दर्शन नळकांडे यांनी १ विकेट घेतला.