फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
Ind Vs Ban Playing 11 : टीम इंडिया २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला या स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे. यासाठी कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते टीम इंडियाच्या प्लेइंग ११ ची निवड करणे. सामन्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शामीचा जोडीदार कोण असणार यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित टीम इंडियाने हर्षित राणाला संघामध्ये स्थान देण्यात आले आहे.
मोहम्मद शामी हा भारताचा अनुभवी फलंदाज आहे, त्यामुळे तो चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळणार हे पक्के आहे. पण त्याचा जोडीदार अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा या दोन वेगवान गोलंदाजांमध्ये स्पर्धा आहे. प्रशिक्षक गंभीर या दोघांपैकी कोणाला प्लेइंग ११ साठी निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुखापतीनंतर मोहम्मद शामी टीम इंडियामध्ये परतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रत्येक सामन्यातील प्लेइंग ११ मध्ये त्याचे स्थान निश्चित मानले जाते. अशा परिस्थितीत, अर्शदीप सिंग किंवा हर्षित राणा यांना दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून स्थान मिळेल. हार्दिक पांड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉन्टिंगने अर्शदीपच्या खेळण्यावर शंका व्यक्त केली आहे. जर असे झाले तर हर्षितला बेंचवर बसावे लागू शकते.
अर्शदीप सिंगने २०२२ मध्ये टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने फक्त ९ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, त्याने टी-२० मध्ये संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. २०२४ मध्ये, त्याला आयसीसीने टी२० क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारानेही सन्मानित केले.
टीम इंडियाचे सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंग करताना दिसली. तिसऱ्या स्थानावर विराट कोहली फलंदाजी करेल तर श्रेयस अय्यर चौथ्या स्थानावर असू शकतो. विकेटकिपरमध्ये भारताचा संघाकडे दोन ऑप्शन आहेत केएल राहुल आणि रिषभ पंत. पण प्लेइंग ११ मध्ये केएल राहुलला संधी मिळण्याचे चान्स जास्त आहेत. भारताकडे तीन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा हे ऑप्शन आहेत. यामध्ये रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याची संधी आहे. हार्दिक पंड्या हा भारताचा महत्वाचा अष्टपैलू आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हर्षित राणाने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रशिक्षक गंभीर सतत त्याच्यावर विश्वास दाखवत आहेत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान त्याला कसोटी पदार्पणाची संधीही मिळाली. राणाने आतापर्यंत खेळलेल्या ३ एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्स घेतल्या आहेत.