सौैजन्य - Bajrang Punia 'देशाच्या कन्येचा विजयासाठी खूप अभिनंदन....'; विधानसभेत बाजी मारल्यानंतर बजरंग पुनियाकडून विनेशचे कौतुक
Bajrang Punia Reaction on Vinesh Phogat : भारताची दिग्गज कुस्तीपटू तथा ऑलिंपियन विनेश फोगाट (vinesh phogat election result) हिने ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर कुस्तीला रामराम करीत राजकीय आखाड्यात नशीब आजमावले. विनेशने काँग्रेसमध्ये प्रवेश करीत 2024 च्या हरियाणा विधानसभेतून जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आज त्याचा निकाल आल्यानंतर विनेशने कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव करीत 5761 मतांनी विजय प्राप्त केला आहे.
जुलाना मतदारसंघातून लढवली निवडणूक
भारताची स्टार ऑलिम्पिकपटू विनेश फोगटने २०२४ ची हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून निवडणकू लढवली होती. तिने जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. जी जींद जिल्ह्यात येते. बजरंग पुनिया यांनीही विनेश फोगटसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बजरंग पुनियाने 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात त्याची सहकारी कुस्तीपटू विनेश फोगटसाठी ट्विट केले आहे. विनेश फोगटच्या विजयासंदर्भात हे ट्विट करण्यात आले आहे.
बजरंग पुनियाकडून कौतुक
देश की बेटी विनेश फोगाट को जीत की बहुत बहुत बधाई।
यह लड़ाई सिर्फ़ एक जुलाना सीट की नहीं थी, सिर्फ़ 3-4 और प्रत्याशियों के साथ नहीं थी, सिर्फ़ पार्टियों की लड़ाई नहीं थी।
यह लड़ाई देश की सबसे मज़बूत दमनकारी शक्तियों के ख़िलाफ़ थी। और विनेश इसमें विजेता रही।#VineshPhogat… pic.twitter.com/dGR5m2K2ao
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) October 8, 2024
बजरंग पुनिया यांनी विनेश फोगटचे अभिनंदन
बजरंग पुनियाने आपल्या एक्सवर ट्विट केले आहे. ज्यामध्ये विनेश फोगटचा फोटो आहे. हा फोटो शेअर करताना बजरंग पुनियाने विनेशचे जुलाना विधानसभा मतदारसंघात विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले की, “देशाची कन्या विनेश फोगट हिच्या विजयासाठी खूप खूप अभिनंदन.” त्यांनी पुढे लिहिले की, “ही लढत फक्त एका जुलाना जागेसाठी नव्हती, फक्त आणखी 3-4 उमेदवारांसह नाही, फक्त पक्षांची लढाई नव्हती. ही लढाई देशातील सर्वात मजबूत दमनकारी शक्तींविरुद्ध होती आणि त्यात विनेश विजयी होती. मात्र, वृत्त लिहेपर्यंत निवडणूक आयोगाने जुलाना जागेचा अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही.
फायनलमधून अपात्र ठरल्यानंतर विनेशने कुस्ती सोडली
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगटने उपांत्य फेरीपर्यंत मोठ्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वीच ती अपात्र ठरली होती. त्या अंतिम सामन्यात विनेश फोगट सुवर्णपदक जिंकू शकेल असे सर्वांना वाटत होते. त्यांच्या अपात्रतेमुळे संपूर्ण देश दु:खी झाला होता. यानंतर विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी विनेशने तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.