Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: ना झुकला, ना थांबला! 18 वर्षे ‘विराट’ राज; ‘चेज मास्टर’ कसा बनला क्रिकेटचा ‘किंग’?

Virat Kohli's 18 years in international cricket: स्टार फलंदाज विराट कोहलीने १८ ऑगस्ट २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ वर्षे पूर्ण केली. या १८ वर्षात विराटने आपला दबदबा कायम ठेवला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 18, 2026 | 02:49 PM
Virat Kohli: ना झुकला, ना थांबला! 18 वर्षे ‘विराट’ राज; ‘चेज मास्टर’ कसा बनला क्रिकेटचा ‘किंग’?
Follow Us
Follow Us:
  • 18 वर्षांचा ‘विराट’ राज
  • क्रिकेटमधील १८ वर्षे पूर्ण
  • विराट कोहली १८ ऐतिहासिक विक्रम
जगातील महान खेळाडूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने आजच्याच दिवशी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ‘चेस मास्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८ ऑगस्ट २००८ रोजी दांबुला येथे श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात खेळला. त्यावेळी कोणीही कल्पना केली नव्हती की हा खेळाडू जागतिक क्रिकेटवर राज्य करेल आणि ‘क्रिकेटचा राजा’ बनेल.

IND vs PAK: भारत-पाकिस्तान महामुकाबला! टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामना?

३७ वर्षीय कोहलीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली १८ वर्षे पूर्ण केली आहेत आणि या १८ वर्षांच्या थक्क करणाऱ्या प्रवासात त्याने असे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत, जे कोणत्याही खेळाडूला मोडणे कठीण आहे. विराटच्या १८ वर्षातील १८ ऐतिहासिक विक्रम कोणते, जाणून घेऊयात.

विराट कोहली १८ ऐतिहासिक विक्रम

एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त शतके करणारा एकमेव फलंदाज: विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० किंवा त्याहून अधिक शतके करणारा जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याच्या नावावर ५४ एकदिवसीय शतके आहेत.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके: सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये, एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ११ शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. इतकेच नव्हे तर, त्याने २०१७ आणि २०१८ या सलग दोन वर्षांत हा पराक्रम केला.

एकाच एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा: विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीमुळे त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात ७६५ धावा केल्या. एकाच विश्वचषक स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

VIRAT KOHLI COMPLETED 18 YEARS IN INTERNATIONAL CRICKET 🐐 – Relive the greatest Knock in T20I history, King vs Pakistan in 2022 T20 World Cup. pic.twitter.com/TNPbfN8sVq — Johns. (@CricCrazyJohns) August 18, 2026

एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ८ ते १४ हजार धावा: ‘रन मशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ८,०००, ९,०००, १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,००० धावा करण्याचा विक्रम आहे.

एका दशकात २० हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा: २०११ ते २०२० या दशकात २०,००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट हा एकमेव क्रिकेटपटू आहे.

धावांचा पाठलाग करताना शतकांचा बादशाह: ‘चेस मास्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना २९ शतके झळकावली आहेत. यापैकी २४ शतके भारताच्या विजयांमध्ये आली.हा स्वतःच एक वेगळा विक्रम आहे.

सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार: विराट कोहली हा सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार आहे. कोहलीच्या कर्णधारपदाखाली भारताने ४० कसोटी सामने जिंकले, जे कोणत्याही भारतीय कर्णधाराने जिंकलेले सर्वाधिक सामने आहेत.

सर्वाधिक सामनावीर पुरस्कार: विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७१ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. या एकूण संख्येत तो फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे.

सर्वात जलद ७,००० कसोटी धावा: सर्वात जलद ७,००० कसोटी धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने केवळ ८१ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.

भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतके: कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक ७ कसोटी द्विशतके आहेत, जी कोणत्याही भारतीय कर्णधाराने केलेली सर्वाधिक द्विशतके आहेत.

परदेशी कसोटी मालिकेत सलग ४ शतके: परदेशी भूमीवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत सलग चार शतके झळकावणारा विराट पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारा भारतीय कर्णधार: २०१७ मध्ये, विराटने श्रीलंकेविरुद्ध अवघ्या ९३ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते, जे कोणत्याही भारतीय कर्णधाराने केलेले सर्वात जलद कसोटी शतक आहे.

श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय शतकाचा विक्रम: एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध १० शतके झळकावली आहेत.

श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके: विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकूण १५ शतके झळकावली असून, हा एक विक्रम आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके: विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९ शतके झळकावली असून, हा सर्वाधिक विक्रम आहे.

सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार: विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा, म्हणजेच २२ वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीर: विराट कोहलीने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७ वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे, जो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक आहे.

तिन्ही फॉरमॅटमध्ये ९००+ आयसीसी रेटिंग: विराट कोहली हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय या तिन्ही फॉरमॅटमध्ये ९०० पेक्षा जास्त आयसीसी रेटिंग गुण मिळवले आहेत.

Asian Games 2026 साठी अफगाणिस्तानने जाहीर केला संघ; ‘या’ खेळाडूकडे सोपवली कर्णधारपदाची धुरा

Web Title: Virat kohli 18 years international cricket 18 historic records

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • captain Virat Kohli
  • Record
  • Virat Kohli

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.