Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: बंगळूरु चेंगराचेंगरीवर विराट कोहलीने 3 महिन्यांनंतर मौन सोडले, म्हणाला- “आनंदाचा क्षण एका दुःखद….”

बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा बळी गेला. या हृदयद्रावक घटनेवर आता विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली असून, आरसीबीच्या वतीने पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 03, 2025 | 02:57 PM
Virat Kohli: बंगळूरु चेंगराचेंगरीवर विराट कोहलीने 3 महिन्यांनंतर मौन सोडले, म्हणाला- “आनंदाचा क्षण एका दुःखद….”
Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli On Bengaluru Stampede: आयपीएल 2025 चा (IPL 2025) हंगाम अनेक कारणांमुळे खास होता, पण त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB) 18 वर्षांनंतर अखेर विजेतेपद पटकावले. संपूर्ण देश आनंदात असताना, नियतीने घात केला आणि 4 जून रोजी बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने देशाला हादरवून सोडले. आरसीबीच्या विजयानंतर झालेल्या या दुःखद अपघातात 11 लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर 56 जण गंभीर जखमी झाले. व्यवस्थापनातील त्रुटींमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले. या हृदयद्रावक घटनेवर आता विराट कोहलीने मौन तोडले असून, पीडितांच्या कुटुंबीयांसाठी एक भावनिक संदेश पाठवला आहे.

विराट कोहलीने पीडितांच्या कुटुंबियांसाठी व्यक्त केली सहानुभूती

आरसीबीने नुकतीच RCB Cares नावाची एक संस्था सुरू करण्याची घोषणा केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून, चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली जाणार आहे. आरसीबीच्या अधिकृत वेबसाइटवर विराट कोहलीचे एक निवेदन प्रसिद्ध झाले आहे. या निवेदनात कोहली म्हणाला, “4 जून रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेसाठी कोणीही तयार नव्हते. आमच्या फ्रँचायझीसाठी आनंदाचा क्षण एका दुःखद घटनेत बदलला. ज्यांनी आपले प्रियजन गमावले किंवा जखमी झाले, त्या सर्व कुटुंबांचा मी विचार करत आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे नुकसान आता आमच्या कथेचा भाग आहे. आपण सर्वजण आता काळजी, सन्मान आणि जबाबदारीने एकत्र पुढे जाऊ.”

Virat Kohli on the tragic events in Bengaluru. pic.twitter.com/MwMgMb9JaJ — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 3, 2025

हे देखील वाचा: ‘आमच्या नात्यावर परिणाम, माझी चूक झाली..’, किंग कोहलीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावरुन माजी क्रिकेटपटू गहिवरला 

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरची परिस्थिती कशी बिघडली?

आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अचानक चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयाचा उत्सव साजरा करण्याची घोषणा केली. आयोजनात योग्य नियोजनाचा अभाव होता आणि पुरेसे पोलिस कर्मचारीही उपलब्ध नव्हते. आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी जमली, ज्यामुळे स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. कर्नाटक उच्च न्यायालयाने या घटनेसाठी आरसीबी, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला जबाबदार धरले आहे.

बंगळूरुमधून सामने इतर ठिकाणी हलवले

या घटनेनंतर, कर्नाटक सरकारने चिन्नास्वामी स्टेडियमला ‘असुरक्षित’ घोषित केले आहे. यामुळे, महिला विश्वचषकाचे सामने बंगळूरुमधून नवी मुंबईला हलवण्यात आले आहेत. तसेच, स्थानिक क्रिकेट लीग महाराजा टी-20 चे सामनेही बंगळूरुऐवजी म्हैसूर येथे खेळवले जात आहेत. बंगळूरुमध्ये लवकरच 60,000 प्रेक्षक क्षमतेचे नवीन स्टेडियम बांधले जाणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे.

Web Title: Virat kohli breaks silence on bengaluru stampede after 3 months says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • Bengaluru
  • cricket
  • RCB
  • Sports News
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

पाकिस्तानात जन्मलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संस्मरणीय प्रवासाचा होणार शेवट…पत्रकार परिषदेमध्ये झाला इमोशनल
1

पाकिस्तानात जन्मलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संस्मरणीय प्रवासाचा होणार शेवट…पत्रकार परिषदेमध्ये झाला इमोशनल

शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त
2

शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त

उस्मान ख्वाजा का घेतोय निवृती? माजी खेळाडूवर साधला निशाणा… ऑस्ट्रेलियन प्लेयरच्या विधानाने खळबळ
3

उस्मान ख्वाजा का घेतोय निवृती? माजी खेळाडूवर साधला निशाणा… ऑस्ट्रेलियन प्लेयरच्या विधानाने खळबळ

मृत्यूशी झुंजणाऱ्या डेमियन मार्टिनची तब्येत कशी आहे? मित्र अ‍ॅडम गिलख्रिस्टने केला खुलासा, म्हणाला – गेल्या २४ तासांत…
4

मृत्यूशी झुंजणाऱ्या डेमियन मार्टिनची तब्येत कशी आहे? मित्र अ‍ॅडम गिलख्रिस्टने केला खुलासा, म्हणाला – गेल्या २४ तासांत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.