वीरेंद्र सेहवाग आणि एम एस धोनी(फोटो-सोशल मीडिया)
Virender Sehwag’s comment on MS Dhoni : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याची क्रेज अजून देखील भारतीय चाहत्यांच्या मनात कायम आहे. सेहवाग हा नेहमीच त्याच्या परखड बोलण्याने चर्चेत असतो. कधी कधी त्याचे काही वादग्रस्त विधानं देखील खूप चर्चीले जात असतात. कधी काळी या फलंदाजाने विरोधी टीमला घाम फोडत असे. अशातच त्याने एक विधान करून भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये गलबल उडवून दिली. सेहवागने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनीबद्दल मोठे विधान केले आहे. त्याच्या विधानाने क्रिकेट विश्वात धुमाकूळ घातला आहे. तर भारताचा हा स्फोटक फलंदाज नेमकं काय बोलला? याबाबत आपण जाणून घेऊया.
सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील संबंध बऱ्याच वेळा ताणलेले दिसून आले आहेत. याबाबतचे याचे एक उदाहरण म्हणजे टी-२० विश्वचषक २००७ मधील दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळला गेला. या विश्वचषकातील पहिल्या टी-२० विश्वचषक सामन्यात भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा अंतिम ११ मधून सेहवागला वगळण्यात आले होते. त्याच्या जागी युसूफ पठाणला पाकिस्तानविरुद्धच्या जेतेपदाच्या लढतीत खेळवण्यात आले होते. आता तर सेहवागने म्हटले आहे की, त्याने २००७-०८ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार केला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान खेळवण्यात आलेल्या त्रिकोणी मालिकेत यजमान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये इलेव्हनमधून वगळण्यात आल्यानंतर सेहवागने निवृत्तीचा विचार केल्याचे सांगितले. या मालिकेत सेहवागने ५ सामन्यांमध्ये केवळ ८१ धावा केल्या होत्या. त्यानंतर सेहवागच्या जागी रॉबिन उथप्पाची सचिनचा जोडीदार म्हणून निवडण्यात करण्यात आली होती.
हेही वाचा : ‘कहीं आग लगे लग जावे..’, माजी टेनिसपटून सानिया मिर्झाला कुणाच्या आठवणीत झुरतेय? VIDEO VIRAL
एका यूट्यूब चॅनेलवर बोलताना सेहवाग म्हणाला की, त्याने सचिन तेंडुलकरसोबत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत बोलला होता. सचिनने त्याला चांगला निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ घेण्याचा आणि भावनांमध्ये वाहून न जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी सचिनने एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती न घेण्याचा निर्णय दिला होता. जो नंतर योग्य ठरला कारण नंतर आम्ही २०११ मध्ये विश्वचषक जिंकला.
सेहवाग पुढे म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलियामध्ये २००७-०८ च्या मालिकेत मी पहिले तीन सामने खेळलो होतो, परंतु त्यानंतर माझी संघात निवड करण्यात आली नव्हती. मग मला जाणवले की जर मी संघाचा भाग जर होऊ शकत नाही, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्यात काही एक अर्थ नाही. मग मी तेंडुलकरकडे गेलो आणि सांगितले की मी एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्त घेण्याचा विचार करत आहे. यावर सचिनने त्याने नाही असे सांगितले. त्याने म्हटले की मी देखील १९९९-२००० मध्ये या टप्प्यातून गेला आहे.
हेही वाचा : जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण
सेहवाग पुढे म्हणाला की, “सचिन म्हणाला तेव्हा त्यालाही वाटले की मी क्रिकेट सोडून द्यावे, पण तो काळ आला आणि गेला. तू ही या टप्प्यातून जात आहेस. भावनिक असताना कोणताही निर्णय घेऊ नये. तुमचा वेळ घ्या आणि १-२ मालिका घ्या. त्यानंतरच कोणताही निर्णय घ्यायाला तयार व्हा.” सेहवाग म्हणाला, “मालिका संपली तेव्हा मी पुढच्या मालिकेत खेळलो आणि खूप धावा काढल्या. मी २०११ च्या विश्वचषकात खेळलो आणि आम्ही विश्वविजेतेपद पटकावले.”