दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी (Photo Credit- X)
T20 World Cup. WICKET! 19.6: Arshdeep Singh 2(2) Run Out Malan Kruger, India 209/9 https://t.co/SQLoaZjq98 #TeamIndia #INDvNAM #T20WorldCup — BCCI (@BCCI) February 12, 2026
दरम्यान, नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली. संजू सॅमसनने फलंदाजी करताना तीन उत्तुंग षटकार मारले. तो ८ चेंडूत २२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशनने २० चेंडूत जलद अर्धशतक झळकावले. तो ६१ धावा काढून बाद झाला. हार्दिक पंड्याने २८ चेंडूत ५२ धावा करत भारताचे नेतृत्व केले. तिलक वर्मा २५, तर सूर्यकुमार यादव १२ धावा काढून बाद झाला. भारताने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून २०९ धावा केल्या. नामिबियाकडून कर्णधार गेरहार्ड इरास्मसने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नामिबियाला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकात २१० धावा करायच्या आहे.
भारत प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
नामिबिया प्लेइंग इलेव्हन : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, झेन ग्रीन (डब्ल्यू), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो






