Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीत रंगणार ‘विश्वजित मराठी सेलिब्रिटी Cricket League’; ‘या’ तारखेला रंगणार ‘VMPL’चा महासंग्राम

सांगली जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत डॉ. विश्वजित कदम यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी अभिजित कदम मेमोरियल फौंडेशनतर्फे सर्वतोपरी सहकार्याची जबाबदारी स्वीकारली आहे असे यावेळी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 03, 2026 | 05:29 PM
सांगलीत रंगणार ‘विश्वजित मराठी सेलिब्रिटी Cricket League’; ‘या’ तारखेला रंगणार ‘VMPL’चा महासंग्राम
Follow Us
Follow Us:
  • सांगलीत रंगणार विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लिग
  • भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये अभिनेत्यांची मांदियाळी
  • आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
पुणे: सांगली येथे पहिल्यांदाच होणार्‍या विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लिग स्पर्धेच्या जर्सी तसेच ट्रॉफी अनावरण व खेळाडू निवड सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. धनकवडी येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आयपीएलच्या धर्तीवर व्हीएमपीएलच्या सोहळ्यास मराठी चित्रपट कलाकारांची मांदियाळी जमली होती.  भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली व अभिजित कदम मेमोरियल फौंडेशनच्यावतीने १५ व १६ ऑगस्ट रोजी सांगलीतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एसबीजीआय टर्फमध्ये प्रकाश झोतात या स्पर्धा होणार आहेत.

या सोहळ्यास सांगलीचे राजे विजयसिंहराजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन, महाराष्ट्र डिजिटल मिडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, ज्येष्ठ अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते संजय जाधव, सौरभ गोखले, शशांक केतकर, हार्दिक जोशी, प्रथमेश परब, धनंजय पवार, सोनाली पाटील यांच्यासह बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. ‘सांगलीत’ जावून आम्ही क्रिकेट खेळणार आणि मनमुराद आनंद लुटणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कला, राजकारण, समाजकारणासह नाट्य व क्रीडापंढरी असलेल्या सांगलीला कुस्ती, कबड्डीसह क्रिकेटचाही इतिहास आहे. दुबई, थायलंड पाठोपाठ आता सांगलीत पहिल्यांदाच विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट तिसरी लिग सांगलीत आयोजित करण्याचा निर्धार सांगलीचे रणजीपटू खेळाडू युवा अभिनेते, दिग्दर्शक विज्ञान माने यांनी केला होता. त्यातून या स्पर्धेचे संपूर्ण पालकत्व भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजित कदम यांनी स्वीकारत अभिजित कदम मेमोरियल फौंडेशनतर्फे त्याला पाठबळ दिले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली १५ व १६ ऑगस्ट रोजी मिरजेतील संजय भोकरे कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट येथील एसबीजीआय टर्फ क्रिकेट मैदानावर सायंकाळी प्रकाश झोतात होणार्‍या स्पर्धेत सुमारे ६० हून अधिक कलाकार क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. यात सुमारे सात संघांचा सहभाग असेल.

वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर

सांगली जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत डॉ. विश्वजित कदम यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी अभिजित कदम मेमोरियल फौंडेशनतर्फे सर्वतोपरी सहकार्याची जबाबदारी स्वीकारली आहे असे यावेळी सांगितले. सोबतच जनप्रवास समुहाच्यावतीने संजय भोकरे यांनी संपूर्ण पाठबळ देत स्पर्धा आयोजनासाठी विज्ञान माने स्टुडिओजसोबत पुढाकार घेतला आहे. सोबतच सचिनभाऊ कदम वेल्फेअर फौंडेशनचे सर्वेसर्वा सचिनभाऊ कदम, नितीश चव्हाण, धनंजय पोवार, पृथ्वीक प्रताप, सागर पाठक यांनी संयोजनासाठी हातभार लावला आहे.

याअंतर्गत स्पर्धेच्या ट्रॉफी, जर्सी व खेळाडूंच्या निवडीचा भव्य सोहळा भारती विद्यापीठ प्रांगणात पार पडला. प्रारंभी कलाकारांचे स्वागत व प्रास्ताविक अभिनेते विज्ञान माने यांनी केले. थायलंड येथे मागील वर्षी झालेल्या मराठी सेलिब्रिटी प्रिमियर लिगचा विजेता, उपविजेता संघ तसेच मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बॅटस्मन आदी खेळाडूंना डॉ. कदम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर विज्ञान माने यांनी प्रास्तविकात लिग विषयी माहिती दिली. याप्रसंगी देऊळबंद 2 चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाबद्दल प्रवीण तरडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

आयपीएलच्या धर्तीवर दिमाखदार सोहळा
आयपीएलच्या धर्तीवर व्हीएमसीसीएलच्या ट्रॉफी व खेळाडूंच्या जर्सी अनावरणाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. स्वागत कमान ते ट्रॉफीचे फुग्यांसह आतषबाजीत उद्घाटन करण्यात आले. त्याचसोबत कलाकारांच्या सात संघांच्या जर्सीचे कप्तानांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय; लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण सिंग निर्दोष, विनेश फोगट संतप्त, म्हणाली…

 हे कलाकार सांगलीत क्रिकेटसाठी मैदानात उतरणार
या स्पर्धेत ज्येष्ठ अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते संजय जाधव, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, शशांक केतकर, हार्दिक जोशी, गौरव मोरे, प्रथमेश परब, धनंजय पवार, प्राजक्ता गायकवाड, सोनाली पाटील,  नितीश चव्हाण (आज्या), प्रथमेश परब (दगडू), आकाश ठोसर (परशा), अभिनय बेर्डे, विशाल निकम, हर्षद हटकरी, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब,  वनिता खरात, प्रख्यात नृत्यांगना गौतमी पाटील, राधा पाटील आदी ६० हून अधिक अभिनेते, अभिनेत्री मैदानात उतरून फटके बाजी व गोलंदाजीसह क्षेत्ररक्षण करणार आहेत.  यासोबतच बिगबॉस फेम रिलस्टार धनंजय पोवार यांच्यासह सुमारे १५० हून अधिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध रिलस्टार्स, इन्फ्लुएन्झर्सचे संघही स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Web Title: Vishwajit marathi celebrity cricket league to be held in sangli and 16 august 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • cricket news
  • Dr. Vishwajeet Kadam
  • sangli news

संबंधित बातम्या

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
1

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
2

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ
3

सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कोल्हापूर खंडपीठाकडून १५ दिवसांची मुदतवाढ

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
4

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.