
Washim Sports News
मेजर ध्यानचंद महान खेळाडू क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा; इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचा उपक्रम
स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये १९, १७ व १४ वर्षांखालील मुले, मुलींनी सहभाग घेतला होता. १४ वर्षांखालील मुले व मुली विजेता सार्थक दिगंबर मुंदे, वेदांत राऊत, अधिरा खडसे, ऋग्वेदी जाधव, समिधा अरखराव, आयुष देशमुख, आशुतोष बेदेकर, निर्मिक मोरे, सृष्टी नरोटे, आराध्य खडसे, आयुष वानखडे यांनी स्पर्धा जिंकली. प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये रोख, ट्रॉफी व मेडल तसेच द्वितीय ३ हजार रुपये रोख ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला ग्राम महसूल अधिकारी अस्मिता भगत, मुख्याध्यापक धीरज पांडे, सहायक शिक्षक गजानन नरोटे, दिगंबर चंद्रकांत मुंदे, रवी गजभिये, दीपक वानखडे, नीलेश वानखेडे, प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्ती वाढीस लागण्यास मदत झाली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील सॉफ्ट टेनिस खेळाला प्रोत्साहन मिळून भविष्यात अधिक गुणवंत खेळाडू घडतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत