फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या T20 मालिका सुरु आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार सामान्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यामधील पहिला सामना ८ नोव्हेंबर रोजी झाला यामध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला ६१ धावांनी पराभूत केलं आणि मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. आज या मालिकेचा दुसरा सामना रंगणार आहे. आज हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे, सामना सुरु होण्याच्या अर्धा तासाआधी नाणेफेक होईल. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकले नाही परंतु संजू सॅमसनच्या कमालीच्या शतकीय खेळीने भारताच्या संघाला विजय मिळवून दिला.
पहिल्या T20 मध्ये संजू सॅमसन वगळता इतर फलंदाज धावा करू शकले नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्धच्या शतकापासून अभिषेक शर्माचा फॉर्म खराब आहे. टिळक वर्माचा कॅमिओ वगळता, हार्दिक पांड्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादव छाप पाडण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या सामन्यात प्रत्येकजण आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतील. त्याच वेळी, पहिल्या T20I मध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात होती, परंतु तसे झाले नाही. आता गेकेबेहारामध्ये दुसऱ्या T20 सामन्यात पावसाची शक्यता आहे वादळाचीही शक्यता आहे असे म्हंटले जात आहे. आजचे गेकेबेहारामध्ये कशा प्रकारचे हवामान असेल यावर एकदा नजर टाका.
हेदेखील वाचा – बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामान्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर! दोन युवा खेळाडूंना मिळाली संधी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या T20 सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. वादळाची 11 टक्के शक्यता आहे. नाणेफेकीच्या वेळी (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता) पावसाची शक्यता ४९ ते ५४ टक्के आहे. सामन्याच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता 40 टक्क्यांपर्यंत कमी होते. रात्री 8 वाजेपर्यंत पावसाची शक्यता 63 टक्के आहे. सामना वाहून जाऊ शकत नाही, परंतु पावसामुळे सामन्यात अडथळा येऊ शकतो. तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
सेंट जॉर्ज पार्कची खेळपट्टी संतुलित आहे. येथील खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांसाठी अनुकूल असते, पण जसजसा सामना पुढे सरकतो तशी फिरकीपटूंना मदत मिळू लागते. नाणेफेक जिंकणारे संघ सहसा येथे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. गेकेबेहारामध्ये दक्षिण आफ्रिकेचा विक्रम चांगला आहे. संघाने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. गेल्या वर्षीही भारताचा पराभव झाला होता. अशा स्थितीत टीम इंडियाला सावध राहण्याची गरज आहे.
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई/यश दयाल, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंह.