भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (फोटो- सोशल मिडिया)
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत किंवा विश्रांतीनंतर युवा फलंदाज शुभमन गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी करत विजयाने मालिकेची सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. तर दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा संघ शाई होपच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कडवी टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील बहुप्रतिक्षित एकदिवसीय सिरिजला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. शाई होपच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजचा संघ सज्ज झाला आहे. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघही पहिल्या सामन्याच्या ठिकाणी म्हणजे तिरुअनंतपुरम येथे दाखल झाला आहे.
भारत अन् वेस्ट इंडिज यांच्यातील सिरीजचा पहिला सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. तर दीड वाजता टॉस होणार आहे. 50 ओव्हर्सचा सामना असल्याने हा सामना रात्री 10 ते 10.30 वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
भारताचा एकदिवसीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जैस्वाल, नमन धीर.IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
वेस्ट इंडिज एकदिवसीय संघ: शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्ह्स, अमीर जांगू, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेर्फेन रदरफोर्ड, जेडन सील्स.






