Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहेत Andy Pycroft? ज्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानने केली मागणी

आशिया कप २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्यात झालेल्या वादामुळे मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी पाकिस्तानने आयसीसीकडे केली. या मागणीमुळे मोठा वाद निर्माण झाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 17, 2025 | 10:23 PM
कोण आहेत Andy Pycroft? (Photo Credit- X)

कोण आहेत Andy Pycroft? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • कोण आहेत Andy Pycroft?
  • ज्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानने केली मागणी
  • ICC कडे केली तक्रार
Who is Andy Pycroft?: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान मोठा वाद झाला. सामन्याच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्यानंतर, सामना संपल्यानंतर टीम इंडिया थेट ड्रेसिंग रूममध्ये गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. या सर्व घटनांनंतर पाकिस्तानचे कर्णधार सलमान पोस्ट मॅच मुलाखतीसाठीही आला नाही. आता, पाकिस्तानने या सर्व प्रकारासाठी मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानने ICC कडे केली तक्रार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून सांगितले की, पाकिस्तानने अँडी पायक्रॉफ्ट यांच्या विरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर त्यांना या स्पर्धेतून काढून टाकण्याचीही मागणी केली आहे. आयसीसीमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत पाकिस्तानचे म्हणणे आहे की, पायक्रॉफ्ट यांनी पक्षपाती भूमिका घेतली. मॅच रेफ्री या नात्याने ते दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद पाकिस्तानने केला आहे.

Remember the name – “Andy Pycroft” from Zimbabwe 🇿🇼 pic.twitter.com/7IRyNGajbp — Richard Kettleborough (@RichKettle07) September 17, 2025


मिळालेल्या माहितीनुसार, जर अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी मान्य झाली नाही, तर पुढील सामना यूएईविरुद्ध खेळणार नाही, अशी धमकीही पाकिस्तानने दिली होती. पण, आयसीसीने पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली.

अरेरे! काय रे पाकिस्ताना? पुन्हा नाचक्कीच! जपानमध्ये जाण्यासाठी बनावट फुटबॉल संघ बनवला; विमानतळावर अटक

कोण आहेत अँडी पायक्रॉफ्ट?

झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू असलेले अँडी पायक्रॉफ्ट हे जगातील सर्वात अनुभवी मॅच रेफ्रींपैकी एक आहेत. २००९ पासून ते आयसीसीच्या एलिट पॅनेलचा भाग आहेत. आतापर्यंत त्यांनी १०३ कसोटी सामन्यांसह २४८ वनडे आणि १८३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रेफ्री म्हणून भूमिका बजावली आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी २१ महिला टी-२० सामन्यांमध्येही मॅच रेफ्री म्हणून काम केले आहे.

६९ वर्षीय अँडी पायक्रॉफ्ट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले आहेत. त्यांनी झिम्बाब्वेकडून ३ कसोटी आणि २० वनडे सामने खेळले आहेत. त्यांच्या नावावर एकूण ४४७ धावांची नोंद आहे. १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत कपिल देव यांनी १७५ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती, तेव्हा अँडी पायक्रॉफ्ट हे झिम्बाब्वे संघाचा भाग होते.

Web Title: Who is andy pycroft pakistan demanded his removal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 10:21 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • pakistan
  • Sports
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

पहिल्या गेममध्ये धक्का, पुढच्या दोन गेममध्ये धुमाकूळ! अश्मिता चलिहा बनली Korea Masters 2026 चॅम्पियन
1

पहिल्या गेममध्ये धक्का, पुढच्या दोन गेममध्ये धुमाकूळ! अश्मिता चलिहा बनली Korea Masters 2026 चॅम्पियन

इंडोनेशियात तिरंगा फडकावण्यासाठी पुण्याचा सार्थक चव्हाण सज्ज! Asia Road Racing मध्ये पुन्हा रचणार इतिहास?
2

इंडोनेशियात तिरंगा फडकावण्यासाठी पुण्याचा सार्थक चव्हाण सज्ज! Asia Road Racing मध्ये पुन्हा रचणार इतिहास?

Carrom Sports News: कॅरम स्पर्धेत पुणेकरांचा डंका! अभिजीत त्रिपणकर अन् आयुष गरुडची दुसऱ्या फेरीत धडक
3

Carrom Sports News: कॅरम स्पर्धेत पुणेकरांचा डंका! अभिजीत त्रिपणकर अन् आयुष गरुडची दुसऱ्या फेरीत धडक

Table Tennis: रोहित देसाईचा थरारक विजय! सुयोग पाटीलला नमवत पटकावले ‘प्लेअर्स कप २०२६’ चे विजेतेपद
4

Table Tennis: रोहित देसाईचा थरारक विजय! सुयोग पाटीलला नमवत पटकावले ‘प्लेअर्स कप २०२६’ चे विजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.