Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? माजी मुख्य निवडकर्त्यांचे खळबळजनक विधान

IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये कप्तानीवरून नवा वाद सुरू झाला आहे. माजी निवडकर्ते के. श्रीकांत यांनी हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 22, 2026 | 10:00 PM
IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? (photo Credit- X)

IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप?
  • Hardik Pandy कर्णधारपद सोडणार?
  • माजी मुख्य निवडकर्त्यांचे खळबळजनक विधान
आयपीएलच्या 19व्या (IPL 2026) हंगामाचा बिगुल 28 मार्चपासून वाजणार आहे. मात्र, मैदान गाजण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स (MI) संघातील नेतृत्वाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. टीम इंडियाचे माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी एक मोठे विधान करत खळबळ उडवून दिली आहे. “हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने आयपीएल 2026 मध्ये स्वतःहून कर्णधारपद सोडले पाहिजे आणि संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) सोपवावी,” असे श्रीकांत यांनी म्हटले आहे.

नेमका वाद काय?

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून मुंबई इंडियन्समध्ये परत आणले गेले होते. त्यानंतर अनुभवी रोहित शर्माला हटवून थेट हार्दिककडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. या निर्णयामुळे चाहते प्रचंड संतापले होते आणि सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका झाली होती. तेव्हापासून मुंबईच्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

हार्दिकच्या नेतृत्वाखालील मुंबईची कामगिरी

हार्दिक पंड्याच्या कप्तानीखाली मुंबई इंडियन्सचा आलेख चढ-उताराचा राहिला आहे:

  • IPL 2024: संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या म्हणजेच 10 व्या स्थानी होता.
  • IPL 2025: संघाने कामगिरीत सुधारणा करत चौथे स्थान पटकावले. संघाने पुनरागमन केले असले तरी, विजेतेपदाची ट्रॉफी मिळवण्यात हार्दिकला अपयश आले आहे.

कोहलीची RCB कडे ‘चार्टर्ड फ्लाईट’ची मागणी? अफवांचे वादळ अन् Virat चे थेट स्पष्टीकरण; वाचा काय आहे सत्य

श्रीकांत यांनी काय दिला सल्ला?

श्रीकांत यांच्या मते, संघात जेव्हा दोन विश्वविजेते कर्णधार (रोहित आणि सूर्या) उपस्थित आहेत, तेव्हा हार्दिकने मोठे मन दाखवायला हवे. ते म्हणाले, “ही परिस्थिती थोडी विचित्र आहे. हार्दिकने स्वतः रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला आहे. अशा स्थितीत त्याने स्वतःहून पुढे येऊन सांगायला हवे की, आता सूर्यकुमारने संघाचे नेतृत्व करावे आणि मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन.”

सूर्यकुमार यादव का आहे प्रबळ दावेदार?

नुकत्याच झालेल्या ICC पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले. मैदानावरील त्याचे आक्रमक निर्णय, चपळ क्षेत्ररक्षण लावण्याची पद्धत आणि खेळाडूंना एकत्र घेऊन चालण्याची शैली यामुळे त्याच्या कप्तानीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच यशामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी सूर्याचे नाव आघाडीवर आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्सचा तगडा स्क्वॉड

या हंगामातही मुंबईकडे हार्दिक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांसारख्या दिग्गजांची फौज आहे. तसेच संघाने क्विंटन डी कॉक, शार्दुल ठाकूर आणि रदरफोर्ड यांसारख्या खेळाडूंना जोडून संघ अधिक मजबूत केला आहे. मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेची सुरुवात 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध करणार आहे. आयपीएलचे 12 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले असून, संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष मुंबईच्या ‘कॅप्टन’ कोण असेल याकडे लागले आहे.

6,6,6,6,6… 23 वर्षीय सलील अरोरा कोण आहे? IPL 2026 च्या आधी पाच चेंडूंमध्ये ठोकले पाच षटकार! फलंदाजीने केला कहर

Web Title: Will hardik pandya step down as captain former chief selector makes sensational statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • mumbai indians
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव
1

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
2

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
3

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान
4

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.