Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Q Sports League Pune: डेक्कन जिमखाना ऐसेस संघाची विजयी सुरुवात! आरसीबीसी ऑल स्टार्सचा ४-१ असा धुव्वा

Pune: स्पर्धेचे उद्घाटन डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस मिहीर केळकर, डेक्कन जिमखाना क्लबचे वित्तसचिव गिरीष इनामदार आणि व्योहरचे जनसंपर्क व्यवस्थापक प्रतिक गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 27, 2026 | 09:41 PM
Q Sports League Pune

Q Sports League Pune

Follow Us
Follow Us:
  • व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक‌’ क्यु स्पोर्ट्‌स लीग
  • डेक्कन ऐसेस संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला
  • आरसीबीसी ऑल स्टार्स संघाचा ४-१ पराभव
पुणे: डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित ‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक‌’ क्यु स्पोर्ट्‌स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेत डेक्कन जिमखाना ऐसेस संघाने आरसीबीसी ऑल स्टार्स संघाचा ४-१ असा पराभव करून (sports) स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस गाजवला. डेक्कन जिमखाना क्लबच्या बिलीयर्डस्‌ आणि स्नुकर हॉलमध्ये झालेल्या या सामन्यात प्रशांत नातू, सचिन बिचे, अनिल दुबे, उदय पुंडे आणि कर्णधार समर खंडेलवाल यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विजयी कामगिरी केली.

पहिल्या एकेरीमध्ये डेक्कन जिमखानाच्या प्रशांत नातू याने अनुप मल्होत्रा याचा १०६-६२ असा पराभव केला. दुहेरीच्या सामन्यात डेक्कनच्या सचिन बिचे आणि अनिल दुबे या जोडीने आरसीबीसीच्या रॉबिन पॉल आणि चिराग मेहता या जोडीचा ८७-७७ असा पराभव केला आणि २-० अशी आघाडी घेतली. डेक्कनच्या सिद्धांत टेंब याचा फरशीद इरानी याने ४०-४७ असा पराभव करून प्रतिकार केला. मात्र, उदय पुंडे याने समीर साल्वा याचा ७५-३६ असा आणि समर खंडेलवाल याने पंकज जगसिया याचा ६१-४८ असा पराभव करून डेक्कन जिमखाना ऐसेस संघाला ४-१ असा विजय मिळवून दिला.

Pune Table Tennis Competition: स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात वरदन कोलतेचा सनसनाटी विजय

मिहीर केळकर यांच्या हस्ते उद्घाटन

याआधी स्पर्धेचे उद्घाटन डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस मिहीर केळकर, डेक्कन जिमखाना क्लबचे वित्तसचिव गिरीष इनामदार आणि व्योहरचे जनसंपर्क व्यवस्थापक प्रतिक गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे बिलीयर्डस्‌ आणि स्नुकर विभागाचे उदय पुंडे, स्पर्धेचे संचालक समर खंडेलवाल, महाराष्ट्र बिलीयर्डस्‌ आणि स्नुकर संघटनेचे समिती सदस्य राजवर्धन जोशी, बिलीयर्डस्‌ आणि स्नुकर विभागाचे सचिव सतिश शाळीग्राम, क्लबचे सदस्य राजेंद्र कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास

सामन्याचा निकाल : गटसाखळी फेरी

डेक्कन जिमखाना ऐसेस वि. वि. आरसीबीसी ऑल स्टार्स ४-१ (प्रशांत नातू वि. वि. अनुप मल्होत्रा १०६-६२; सचिन बिचे / अनिल दुबे वि. वि. रॉबिन पॉल / चिराग मेहता ८७-७७; सिद्धांत टेंब पराभूत वि. फरशीद इरानी ४०-४७; उदय पुंडे वि.वि. समीर साल्वा ७५-३६; समर खंडेलवाल वि.वि. पंकज जगसिया ६१-४८)

Web Title: Winning start deccan gymkhana aces beat rcbc all stars 4 1 q sports league 2026 in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

रोहन सुरवसे-पाटलांच्या पाठपुराव्याला यश; चंदननगर दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित गैरप्रकारांची होणार चौकशी
1

रोहन सुरवसे-पाटलांच्या पाठपुराव्याला यश; चंदननगर दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित गैरप्रकारांची होणार चौकशी

Pune Homes: पुण्यात घर खरेदीदारांची माघार! ३ महिन्यात घटली घरांची मागणी; अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
2

Pune Homes: पुण्यात घर खरेदीदारांची माघार! ३ महिन्यात घटली घरांची मागणी; अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास
3

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला
4

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.