बॅडमिंटन स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
पी.ई.सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकित वीरेन सेठ याने नवव्या मानांकित भारताच्या अश्विन लेनिन मुथुराजचा २१-१०, १०-२१, २१-१० असा तर, हार्दिक दिव्यांशने चौदाव्या मानांकित कार्तिक रूपा सुहासचा २१-११, २१-१६ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. कार्तिक दुबेने बाराव्या मानांकित आरुष पावसकरवर १७-२१, २१-१२, २१-१८ असा सनसनाटी विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत तेराव्या मानांकित बोर्निल आकाश चांगमाईने अनयन बोराहचे आव्हान २१-१५, १९-२१, २१-१७ असे मोडीत काढले. तिसऱ्या मानांकित साई भत्राजूने वैभव सिंगला २१-१८, २३-२१ असे नमविले.
Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय
मुलींच्या गटात आदर्शिनी श्री बूपथी बालाजी हिने सहाव्या मानांकित राधा गाडगीळचा २१-१२, २१-१० असा सहज पराभव केला. धिष्ठा सिंघा गोपीनाथने सातव्या मानांकित हासना श्री मल्लावरपूचे आव्हान १०-२१, २१-१४, १३-०८ असे संपुष्टात आणले. ऋषिका नंदीने निशिका गोखेचा २१-१४, २१-१० असा तर, युतीका चव्हाणने लावण्या कार्कीचा २१-१५, २१-१० असा पराभव करून आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे मानद सर चिटणीस सीए रणजीत नातु, खजिनदार सारंग लागू, सह सचिव आनंद जोशी, स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, गिरीश नातू, मिहीर रतनजामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शोर्या जाव्वाजी / अर्णव शर्मा (भारत) वि. वि. सौर्य महर्जन / सुबिन श्रेष्ठ (नेपाळ) २१-०८, २१-१५; श्रेयस चंद्र शेखर / मयुख देशल्ली भुवनेश्वरा (भारत) वि. वि. दिव्यम केजरीवाल / सुभ्रा केतन मल्लिक २१-१६, २४-२२; आर्यबका ओक्ता डिसाबियन / मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया (इंडोनेशिया) वि. वि. ओझस जोशी / अवधूत कदम (भारत) २१-१८, २१-१७; योगांश सिंग / आथिश श्रीनिवास पीव्ही (भारत) (३) वि. वि. यदुनंदन केंचय्या / अमिथ नटराज (भारत) २१-२३, २१-१७, २१-१२
मुली दुहेरी
चन्थरात मर्ंदाकुल / पर्प्लॉय सुत्तीवारायनॉन (थायलंड) वि. वि. शरयू रांजणे / सोयरा शेलार (भारत) २१-१४, १९-१५;
अक्षया चौधरी आलुरु / गगना श्री चौधरी कोलापनेनी (भारत) वि. वि. अस्मिता खत्री / रिहाना शेरचन (नेपाळ) २१-११, २१-०९;
वर्ण प्रभुनंद / सुहिना रॉय (भारत) वि. वि. यांगचेन डोलकर / त्शेरिंग डेकी यांगडेन (भूतान) २१-०५, २१-०७






