Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s World Cup Final Live Update: विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे; भारताने आफ्रिकेला दिला दुसरा धक्का

महिला विश्वचषकाचा फायनलचा सामना हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना आज नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 02, 2025 | 10:05 PM
IND W vs SA W (Photo Credit - X)

IND W vs SA W (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये महिला विश्वचषकाचा फायनलचा महामुकाबला आज खेळवला जाणार आहे. हा सामना टीम इंडियाच्या संघासाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढाच हा दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी देखील महत्वाचा आहे. आजच्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे तो संघ पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषकाची ट्राॅफी नावावर करणार आहे. दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरिमध्ये इंग्लडच्या संघाला पराभूत करुन अंतीम फेरी गाढली आहे. तर भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या संघाला हरवून फायनलमध्ये स्थान पक्के केले होते.

The liveblog has ended.
  • 02 Nov 2025 09:37 PM (IST)

    02 Nov 2025 09:37 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live : दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका!  ताजमिन ब्रिट्स धावांवर २३ धावबाद

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना सुरू असून भारताने दिलेल्या २९९ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला  ताजमिन ब्रिट्सच्या रूपात पहिला झटका बसल आहे. ब्रिट्स धावांवर २३ धावबाद झाली.

    दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर : ५१/१ 

    ओव्हर : ९.३ 

  • 02 Nov 2025 09:34 PM (IST)

    02 Nov 2025 09:34 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live : दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरुवात; स्कोअर ५० पार  

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना सुरू असून भारताने दिलेल्या २९९ धावांचा दक्षिण आफ्रिका पाठलाग करत आहे. लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स या सलामी जोडीने ५० धावा जोडल्या आहेत.

    दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर : ५१/० 

    ओव्हर : ९  

  • 02 Nov 2025 09:00 PM (IST)

    02 Nov 2025 09:00 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live : दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी मैदानावर;  299 धावांचा करणार पाठलाग 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना सुरू असून भारताने दिलेल्या २९९ धावांचा पाठलाग करण्यासाठी लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स ही दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी मैदानावर उतरली आहे.

    दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर : १/० 

    ओव्हर : १ 

  • 02 Nov 2025 08:27 PM (IST)

    02 Nov 2025 08:27 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live : भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य दिले आहे.

    भारताचा स्कोअर : २९८/७ 

    ओव्हर : ५० 

  • 02 Nov 2025 08:13 PM (IST)

    02 Nov 2025 08:13 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : दीप्ती शर्माचे अर्धशतक; भारताचा स्कोअर २८६ 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारताच्या दीप्ती शर्माने अर्धशतक पूर्ण केले.

    भारताचा स्कोअर : २८६/५ 

    ओव्हर :४८ 

  • 02 Nov 2025 07:54 PM (IST)

    02 Nov 2025 07:54 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : भारताला 5 वा झटका;अमनजोत कौर माघारी

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारताला मनजोत कौरच्या रूपात पाचवा झटका बसला आहे.  मनजोत कौर 12 धावा करून बाद झाली. दिन डी क्लार्कने तीला कॉट  अँड बोल्ड केले.

    भारताचा स्कोअर : 245/5 

    ओव्हर : 43.2 

  • 02 Nov 2025 07:37 PM (IST)

    02 Nov 2025 07:37 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर माघारी; भारताचा स्कोअर 225 /4 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारताला चौथा झटका बसला आहे.  भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर 20 धावांवर बाद झाली आहे. मालाबाने बाद केले.

    भारताचा स्कोअर : 225/4

    ओव्हर : 39.2 

  • 02 Nov 2025 07:19 PM (IST)

    02 Nov 2025 07:19 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : भारताची धावगती मंदावली; भारताचा स्कोअर 200/3 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना सुरू असून तीन विकेट्स गेल्यावर भारतीय संघाची धावगती मंदावली आहे. मैदानावर हरमनप्रीत कौर 14 धावा आणि दीप्ती शर्मा 16 धावांवर खेळत आहे.

    भारताचा स्कोअर : 200/3 

    ओव्हर : 35 

  • 02 Nov 2025 06:56 PM (IST)

    02 Nov 2025 06:56 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : भारताची तिसरी विकेट गेली;  जेमिमाह रॉड्रिग्स 24 धावांवर बाद 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारताला जेमिमाह रॉड्रिग्सच्या रूपात तिसरा झटका बसला आहे. तीला अयाबोंगा खाकाने माघारी धाडले.

    भारताचा स्कोअर : 17/3 

    ओव्हर : 30 

  • 02 Nov 2025 06:46 PM (IST)

    02 Nov 2025 06:46 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : भारताला दूसरा मोठा झटका; सलामीवीर शेफाली वर्मा बाद 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला दूसरा झटका बसला आहे.  भारतीय सलामीवीर शेफाली वर्माचे ८७ धावांवर माघारी गेली आहे. तीला अयाबोंगा खाकाने बाद केले.

    भारताचा स्कोअर : १६६ /२ 

    ओव्हर : २७.५ 

  • 02 Nov 2025 06:36 PM (IST)

    02 Nov 2025 06:36 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : सलामीवीर शेफाली वर्माची चौकारांची बरसात सुरूच; भारताचा स्कोअर 150 पार 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय सलामीवीर शेफाली वर्माचे शानदार प्रदर्शन सुरूच आहे. भारताने आता 150 धावांचा आकडा पार केला आहे.

    भारताचा स्कोअर : 151  /1 

    ओव्हर : 24.1

  • 02 Nov 2025 06:26 PM (IST)

    02 Nov 2025 06:26 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : सलामीवीर शेफाली वर्माची शानदार फलंदाजी; भारताचा स्कोअर 134 /1 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय सलामीवीर शेफाली वर्माची शानदार फलंदाजी करत आहे. ती सध्या 65 धावांवर खेळत आहे. तर जेमिमाह रॉड्रिग्स 14 धावांवर आहे.

    भारताचा स्कोअर : 134 /1 

    ओव्हर : 23   

  • 02 Nov 2025 06:13 PM (IST)

    02 Nov 2025 06:13 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : सलामीवीरशेफाली वर्माचे शानदार अर्धशतक; भारताचा स्कोअर 104/1 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय सलामीवीर शेफाली वर्माचे शानदार अर्धशतक झळकवले. तिने 49 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.

    भारताचा स्कोअर : 107/1

    ओव्हर : 18.2 

  • 02 Nov 2025 06:11 PM (IST)

    02 Nov 2025 06:11 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : भारताला मोठा झटका! सलामीवीर स्मृती मानधना माघारी 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय सलामीवीर स्मृती मानधना बाद झाली आहे. मानधना 45 धावा करून बाद झाली.

    भारतीय स्कोअर : 104 /1 

    ओव्हर : 17.4 

  • 02 Nov 2025 05:39 PM (IST)

    02 Nov 2025 05:39 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : मानधना आणि शेफालीच्या बॅटमधून चौकरांची बरसात

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय सलामी जोडी स्मृति मंधाना-शैफाली वर्मा आपली आक्रमक शैलीत फलंदाजी करत आहे. शेफाली 28 तर मानधना 27  धावांवर खेळत आहे.

    भारतीय स्कोअर : 63 /0

    ओव्हर : 9

  • 02 Nov 2025 05:27 PM (IST)

    02 Nov 2025 05:27 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : मानधना आणि शेफालीचा मैदानावर कहर, 6 षटकांनंतर टीम इंडियाचा स्कोअर 45/० 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय सलामी जोडी स्मृति मंधाना-शैफाली वर्मा आक्रमक फलंदाजी करत आहे. शेफाली 21 तर मानधना 16 धावांवर खेळत आहे.

    भारतीय स्कोअर : 45/0

    ओव्हर : 6 

  • 02 Nov 2025 05:05 PM (IST)

    02 Nov 2025 05:05 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : अंतिम सामन्याचा थरार सुरू; भारतीय सलामीवीर क्रिजवर 

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्याला अखेर  सुरुवात झाली आहे. शफाली वर्मा आणि  स्मृती मानधना ही भारतीय सलामी जोडी मैदानात उतरली आहे.

     

  • 02 Nov 2025 04:44 PM (IST)

    02 Nov 2025 04:44 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे

    दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

    लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), अनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.

  • 02 Nov 2025 04:41 PM (IST)

    02 Nov 2025 04:41 PM (IST)

    IND W vs SA W Final Match Live Score : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन

    IND W vs SA W Live Score Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे

    भारताची प्लेइंग इलेव्हन

    शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.

  • 02 Nov 2025 04:36 PM (IST)

    02 Nov 2025 04:36 PM (IST)

    IND W vs SA W TOSS Update : दक्षिण आफ्रिकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; भारत करणार फलंदाजी 

    IND W vs SA W  Live Update : आयसीसी महिला विश्वचषक अंतिम सामन्याला पावसामुळे विलंब झाला होता. परंतु आता  दक्षिण आफ्रिका महिला संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करणार आहे.

  • 02 Nov 2025 04:26 PM (IST)

    02 Nov 2025 04:26 PM (IST)

    IND W vs SA W TOSS Update : नवी मुंबईत टॉसला १२ मिनिटे शिल्लक; खेळाडू त्यांच्या सरावामध्ये व्यस्त

    IND W vs SA W  Live Update : भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात लवकरच टॉस होणार आहे. टॉसला १२ मिनिटे शिल्लक आहेत आणि खेळाडू त्यांच्या सरावामध्ये व्यस्त दिसत आहेत.

  • 02 Nov 2025 03:57 PM (IST)

    02 Nov 2025 03:57 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : नवी मुंबईत काळे ढग; मैदानात पावसाच्या धावा 

    IND W vs SA W TOSS Live Update : भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. पुस प्रेक्षकांना आशेने झुलवत असताना मैदानाबाहेर भरपूर डबके साचले आहेत. त्यामुळे टॉस होण्यास विलंब होत आहे.

  • 02 Nov 2025 02:59 PM (IST)

    02 Nov 2025 02:59 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : मैदानावर पावसाची रिमझिम

    भारत आणि आफ्रिका यांच्यातील टॉस दुपारी २:३० वाजता होणार होता पण ओल्या आउटफिल्डमुळे तो होऊ शकला नाही आणि आता टॉस दुपारी टाॅस उशीरा होणार आहे, परंतु त्यापूर्वी पुन्हा जमिनीवर रिमझिम पाऊस पडत आहे आणि खेळपट्टी कव्हरने झाकली गेली आहे.

  • 02 Nov 2025 02:36 PM (IST)

    02 Nov 2025 02:36 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : नाणेफेक दुपारी ३ वाजता होईल

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्याचा टॉस दुपारी ३:०० वाजता होईल. पाऊस आणि ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर झाला आहे. सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.

  • 02 Nov 2025 02:30 PM (IST)

    02 Nov 2025 02:30 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : सामन्यापूर्वी कोसळतोय पाऊस

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी डीवाय पाटील स्टेडियमवर मुसळधार पाऊस पडत आहे. दोन्ही संघ स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. 

  • 02 Nov 2025 01:59 PM (IST)

    02 Nov 2025 01:59 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : अशा प्रकारचा अंतिम सामना होण्याची ही पहिलीच वेळ

    महिला विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाशिवाय अंतिम सामना होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका जेतेपदासाठी लढतील. दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचणार आहे, तर भारत तिसऱ्यांदा जेतेपदासाठी लढणार आहे.

  • 02 Nov 2025 01:46 PM (IST)

    02 Nov 2025 01:46 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : लीग स्टेजमध्ये भारताचा आफ्रिकेकडून पराभव

    भारतीय महिला संघाला या सामन्यात बदला घेण्याची संधी आहे. या स्पर्धेत, जेव्हा टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघ आमनेसामने आले, तेव्हा दक्षिण आफ्रिकेने एक रोमांचक सामना जिंकला. त्यामुळे, टीम इंडिया अंतिम सामन्यात बदला घेण्याचा प्रयत्न करेल.

  • 02 Nov 2025 01:34 PM (IST)

    02 Nov 2025 01:34 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : कर्णधार हरमनप्रीत कौर अंतिम सामन्यापूर्वी सज्ज

    भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आता तिची पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. तिने अंतिम सामन्यापूर्वी याबद्दल बोलले देखील.

  • 02 Nov 2025 12:42 PM (IST)

    02 Nov 2025 12:42 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : मानधनाला इतिहास रचण्याची संधी

    स्मृती मानधनाला एक मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे. जर तिने अंतिम सामन्यात ५२ धावा केल्या तर ती महिला एकदिवसीय विश्वचषकात १००० धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय क्रिकेटपटू ठरेल. शिवाय, हा टप्पा गाठणारी ती जगातील १०वी फलंदाज ठरेल.

  • 02 Nov 2025 12:31 PM (IST)

    02 Nov 2025 12:31 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : टीम इंडिया तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार

    टीम इंडिया इतिहासात तिसऱ्यांदा महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. भारताला दोन वेळा पराभव पत्करावा लागला आहे. यावेळी टीम इंडिया ट्रॉफी जिंकण्यास भाग्यवान असेल का? ही एक मोठी संधी आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत आहे.

  • 02 Nov 2025 12:23 PM (IST)

    02 Nov 2025 12:23 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : भारतीय संघाचा विश्वचषकाचा खडतर प्रवास

    भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये महिला विश्वचषकाचा फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा हा फायनलचा प्रवास फार काही सरळ नव्हता. भारतीय महिला संघाचा फायनलपर्यत प्रवास कसा होता यासंदर्भात सविस्तर वाचा.

    बातमी सविस्तर वाचा...

  • 02 Nov 2025 12:09 PM (IST)

    02 Nov 2025 12:09 PM (IST)

    IND W vs SA W Live Update : इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

    २०१७ मध्ये अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची आजची सुवर्णसंधी आहे. आपण सर्वांनी ऐकले आहे की दुसरी संधी फक्त कथांमध्ये दिली जाते, परंतु नशिबाने भारताच्या मुलींना इतिहास लिहिण्याची संधी दिली आहे. नमस्कार, महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या जेतेपदाच्या लढाईच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आणि मी शुभम मिश्रा आहे. उत्कृष्ट क्रिकेट खेळल्यानंतर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. आजचा उत्साह नवीन उंचीवर पोहोचेल अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे.

  • 02 Nov 2025 11:45 AM (IST)

    02 Nov 2025 11:45 AM (IST)

    IND W vs SA W Live Update : जेमिमाकडून पुन्हा एकदा शानदार खेळीची अपेक्षा

    उपांत्य फेरीत भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी जेमिमा रॉड्रिग्जने घेतली. आता तिला अंतिम फेरीतही ही कामगिरी पुन्हा करावी लागेल. हरमनप्रीतकडूनही संघाला मोठ्या अपेक्षा असतील.

  • 02 Nov 2025 10:28 AM (IST)

    02 Nov 2025 10:28 AM (IST)

    IND W vs SA W Live Update : सामना जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस

    आयसीसीने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जाहीर केले की २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकातील विजेत्या संघाला आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम मिळेल. या वर्षी, विजेत्या संघाला ४.४८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा अंदाजे ₹३९.५५ कोटी (अंदाजे ₹३९५.५ दशलक्ष) मिळतील. ही बक्षीस रक्कम मागील आवृत्ती, २०२२ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपेक्षा चार पट जास्त आहे.

  • 02 Nov 2025 10:01 AM (IST)

    02 Nov 2025 10:01 AM (IST)

    IND W vs SA W Live Update : अंतिम सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधाराचं मोठे वक्तव्य

    २०२३ च्या अहमदाबाद विश्वचषकापूर्वी पॅट कमिन्सने दावा केला होता की तो चाहत्यांना शांत करेल. अंतिम फेरीत टीम इंडियाला हरवून त्याने हे साध्य केले. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टनेही असेच विधान केले. पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली, "हा सामना खूप कठीण असणार आहे कारण संपूर्ण प्रेक्षक टीम इंडियासोबत असतील. स्टेडियम कदाचित संपले असेल. ही एक चांगली संधी देखील आहे, कारण चाहत्यांवर खूप दबाव असेल. आशा आहे की, आपण जिंकू आणि मला वाटते की यामुळे त्यांना शांत केले जाईल."

  • 02 Nov 2025 09:37 AM (IST)

    02 Nov 2025 09:37 AM (IST)

    IND W vs SA W Live Update : दक्षिण आफ्रिका संघाची संभाव्य प्लेइंग 11

    लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, स्युने लुस, ॲनेरी डर्कसेन, ॲनेके बॉश, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.

  • 02 Nov 2025 09:26 AM (IST)

    02 Nov 2025 09:26 AM (IST)

    IND W vs SA W Live Update : कशी असू शकते भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11

    शैफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दिप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौड, श्री चर्नी, रेणुका सिंग ठाकूर.

  • 02 Nov 2025 09:15 AM (IST)

    02 Nov 2025 09:15 AM (IST)

    IND W vs SA W Live Update : लाईव्ह कधी आणि कुठे पाहायचा सामना?

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील २०२५ महिला विश्वचषक अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दुपारी ३:०० वाजता खेळला जाईल. टॉस अर्धा तास आधी, दुपारी २:३० वाजता भारतीय वेळेनुसार होईल. भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्सवर सामना थेट पाहू शकतात. तुम्ही जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर सामन्याचे मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकता.

  • 02 Nov 2025 09:08 AM (IST)

    02 Nov 2025 09:08 AM (IST)

    IND W vs SA W Live Update : फायनलच्या सामन्यात पाऊस खेळ खराब करणार?

    हवामानाबाबत, अंतिम सामना पावसाच्या धोक्यात आहे. AccuWeather च्या मते, २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत दिवस आणि रात्र दोन्ही ठिकाणी पावसाची ६३ टक्के शक्यता आहे. ४ ते ७ वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की पावसामुळे सामना विस्कळीत होऊ शकतो. अशा परिस्थितीत, षटकांची संख्या कमी करून सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तथापि, जर २ नोव्हेंबर रोजी सामना खेळवता आला नाही, तर सामना राखीव दिवशी पूर्ण केला जाईल.

  • 02 Nov 2025 08:56 AM (IST)

    02 Nov 2025 08:56 AM (IST)

    IND W vs SA W Live Update : कशी असेल फायनलच्या सामन्यांसाठी नवी मुंबईची खेळपट्टी

    नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त मानली जाते. येथे बरेच चौकार आणि षटकार मारले जातात. त्यामुळे, हा अंतिम सामना उच्च धावसंख्येचा होण्याची अपेक्षा आहे. तथापि, खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकीपटूंचे वर्चस्व असण्याची शक्यता आहे. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी या मैदानावर अधिक सामने जिंकले आहेत. त्यामुळे, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

  • 02 Nov 2025 08:46 AM (IST)

    02 Nov 2025 08:46 AM (IST)

    IND W vs SA W Live Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाची हेड टू हेड आकडेवारी

    भारतीय संघ तिसऱ्यांदा महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी, भारत २००५ आणि २०१७ मध्ये दोनदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु दोन्ही वेळा विजेतेपदापासून दूर राहिला. दरम्यान, दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये एकूण ३४ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी २० सामने टीम इंडियाने जिंकले आहेत, तर १३ सामने आफ्रिकन संघाने जिंकले आहेत. आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा असल्याचे दिसून येते.

  • 02 Nov 2025 08:19 AM (IST)

    02 Nov 2025 08:19 AM (IST)

    IND W vs SA W Live Update : पुरुष क्रिकेट संघाने वुमन इन ब्लूला दिल्या शुभेच्छा!

    भारताचा पुरुष क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. २ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी टी-२० संघाने महिला संघाला शुभेच्छा दिल्या. सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल यांच्यासह खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आणि हरमनप्रीत कौर आणि तिच्या सहकाऱ्यांना ट्रॉफी उंचावण्याचे आवाहन केले.

Web Title: Women world cup final live update south africa challenge before the indian team fans are ready for the world cup epic clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • cricket
  • IND W vs SA W
  • India vs South Africa
  • Sports
  • Women's World Cup

संबंधित बातम्या

IND W vs SA W Final Match : चक दे इंडिया! भारतीय महिलांनी रचला इतिहास; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जिंकला एकदिवसीय विश्वचषक
1

IND W vs SA W Final Match : चक दे इंडिया! भारतीय महिलांनी रचला इतिहास; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जिंकला एकदिवसीय विश्वचषक

IND W vs SA W Final Match : विश्वचषक अंतिम सामन्यात शेफाली वर्माचा धुमाकूळ! ८ वर्षांचा जुना विक्रम केला खालसा
2

IND W vs SA W Final Match : विश्वचषक अंतिम सामन्यात शेफाली वर्माचा धुमाकूळ! ८ वर्षांचा जुना विक्रम केला खालसा

IND W vs SA W Final Match Live : जेतेपद एक पाऊल दूर! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य; शेफाली-दीप्ती चमकली
3

IND W vs SA W Final Match Live : जेतेपद एक पाऊल दूर! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य; शेफाली-दीप्ती चमकली

IND W vs SA W : Women’s ODI World Cup च्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था; नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी
4

IND W vs SA W : Women’s ODI World Cup च्या अंतिम सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था; नवी मुंबईमध्ये वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.