Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Yogi Adityanath यांची ‘X’ वरील  पोस्ट चर्चेत! मुख्यमंत्र्यांच्या घरी विश्वविजेत्या कर्णधाराची घडली भेट.. 

भारतीय संघाचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याबाबत योगी यांनी एक्सवर माहिती दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 03, 2025 | 08:00 PM
CM Yogi Adityanath's post on 'X' is in the news! World-winning captain met at CM's house..

CM Yogi Adityanath's post on 'X' is in the news! World-winning captain met at CM's house..

Follow Us
Close
Follow Us:

Former captain visits Chief Minister’s house:  भारतीय संघाचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचे ही सौजन्याने दिलेली भेट म्हणून वर्णन करण्यात येत आहे. ज्याचा फोटो सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर कपिल देव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, “प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार श्री. कपिल देवजी यांनी आज लखनौ येथील माझ्या अधिकृत निवासस्थानी भेट दिली.”

कपिल देव यांनी १९७८-१९९४ या कालावधीत भारतासाठी क्रिकेट खेळले आहे. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. कपिल देव यांनी १३१ कसोटी सामन्यांमध्ये ५२४८ धावा आणि ४३४ विकेट्स घेतल्याअ आहेत. यासोबतच त्यांनी  २२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३७८३ धावा केल्या आहेत. या काळात त्यांनी २५३ विकेट्स देखील घेतल्याअ आहेत. १९८३ मध्ये भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात त्यांनी मोलाची  भूमिका बजावली आहे.  त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता.

हेही वाचा : अंबाती रायुडूने आरसीबीच्या चाहत्यांना डिवचलं! RCB vs CSK सामन्यापूर्वी उडाली खळबळ, विराट कोहलीचे फॅन्स संतापले

क्रिकेटमधून निवृत्तीनंतर बनले भारताचे प्रशिक्षक..

क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कपिल देव भारताचे प्रशिक्षक देखील बनले होते. त्यांनी १९९९ ते ऑगस्ट २००० पर्यंत भारताचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. तसेच त्यांनी समालोचक आणि हरियाणा क्रीडा विद्यापीठाचे कुलपती अशा वेगवेगळ्या भूमिका देखील चोख बजावल्या आहेत.

प्रख्यात क्रिकेट खिलाड़ी एवं 1983 की विश्व कप विजेता भारतीय क्रिकेट टीम के कप्तान श्री कपिल देव जी ने आज लखनऊ स्थित सरकारी आवास पर शिष्टाचार भेंट की।@therealkapildev pic.twitter.com/10jsXDn8bG — Yogi Adityanath (@myogiadityanath) May 2, 2025

 २०२४ मध्ये पीजीटीआयचे अध्यक्ष म्हणून निवड

कपिल देव यांची जून २०२४ मध्ये प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील एकमताने निवड झाली होती. याआधी, ते २०२१ ते २०२३ पर्यंत पीजीटीआयच्या उपाध्यक्ष आणि गव्हर्निंग कमिटीचे सदस्य राहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात ‘कपिल देव ग्रँट थॉर्नटन इन्व्हिटेशनल’ नावाची गोल्फ स्पर्धा सुरू करण्यात आली.

हेही वाचा : IPL 2025 : ‘विराट भाईंकडेही इतक्या बॅट नसतील..’ Vaibhav Suryavanshi च्या बॅटचा खजाना बघून नितीश राणा आला शरण, पहा व्हिडिओ

मार्च २०२५ मध्ये, पीजीटीआय आणि अदानी ग्रुपने एकत्रितपणे ‘अदानी इन्व्हिटेशनल गोल्फ चॅम्पियनशिप २०२५’ ची घोषणा केली आहे. या स्पर्धेची पहिली आवृत्ती १ ते ४ एप्रिल दरम्यान ग्रेटर नोएडा येथील जेपी ग्रीन्स गोल्फ स्पा रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. ११ वर्षांनी पुन्हा एकदा ही स्पर्धा तिथेच आयोजित करण्यात आली होती.

Web Title: World cup winning captain kavil dev meets uttar pradesh chief minister yogi adityanath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • CM Yogi Adityanath
  • Kapil Dev
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त
1

IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना
2

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे
3

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा
4

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.