
आज कर्णधार श्रेयस अय्यरने अशोक शर्माऐवजी यश ठाकूरला संधी दिली आहे. यश ठाकूरने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने यश ठाकूरला कॅप परिधान केली. यश ठाकूर कोण आहे , त्याबाबत माहिती जाणून घेऊयात. यश ठाकूरच्या क्रिकेट कारकीर्दीबाबत जाणून घेऊयात.
IND Vs ZIM Live: थरारक सामना होणार! सिकदंर रझाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, वैभवच्या कामगिरीकडे लक्ष
कोण आहे यश ठाकूर?
यश ठाकूरचा जन्म कोलकाता येथे 1998 मध्ये झाला आहे. यश ठाकूर विदर्भाच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. यश ठाकूरने फारस्ट क्लास क्रिकेटमध्ये 93 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा एका सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा विक्रम राहिला आहे. त्याने 74 टी 20 सामन्यांमध्ये 110 विकेट्स घेतल्या आहेत. यश ठाकूर वेगवान गोलंदाजी करतो. आता यश ठाकूर आपला पहिला इंटरनॅशनल सामना खेळणार आहे.
A dream realized ✨ Congratulations to Yash Thakur as he is all set to make his #TeamIndia debut 👏👏 Updates ▶️ https://t.co/Z8UUziVx8d #ZIMvIND pic.twitter.com/IXBuP7rOfU — BCCI (@BCCI) July 25, 2026
हरारेच्या मैदानावर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यादरम्यान, सुरुवातीच्या षटकांमध्ये खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना चांगला बाउन्स मिळाला आणि चेंडू स्विंग होण्यासही मदत झाली. यामुळे यजमान झिम्बाब्वेने सुरुवातीच्या षटकांमध्ये मोठ्या संख्येने विकेट्स गमावल्या. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव.
एकदम आक्रमक अन् खळबळजनक! ‘ज्या प्रकारे त्याने…’; श्रेयसचे Vaibhav Suryavanshi च्या खेळीवर भाष्य
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.