Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्रिकेटच्या पंढरीत’ भारतीय पोरीचा ऐतिहासिक डंका! लॉर्ड्सवर कसोटी शतक ठोकणारी Yastika Bhatia ठरली जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू

IND W vs ENG W Test: भारताच्या यास्तिका भाटियाने क्रिकेटचा मक्का असलेल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी शतक झळकावले आहे. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लॉर्ड्सवर शतक ठोकणारी ती जगातील पहिली महिला फलंदाज बनली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 12, 2026 | 07:14 PM
लॉर्ड्सवर कसोटी शतक ठोकणारी Yastika Bhatia ठरली जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू (Photo Credit- X)

लॉर्ड्सवर कसोटी शतक ठोकणारी Yastika Bhatia ठरली जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘क्रिकेटच्या पंढरीत’ भारतीय पोरीचा ऐतिहासिक डंका!
  • लॉर्ड्सवर कसोटी शतक ठोकणारी Yastika Bhatia ठरली जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू
  • वाचा सविस्तर
Yastika Bhatia Hundred: भारतीय महिला क्रिकेटमधील एका नव्या पर्वाची सुरुवात ‘क्रिकेटची पंढरी’ मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर झाली. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात यष्टिरक्षक-फलंदाज यास्तिका भाटियाने (Yastika Bhatia) शानदार शतक झळकावून इतिहास रचला. लॉर्ड्सवर महिला कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी ती पहिली फलंदाज ठरली. २५ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज यस्तिकाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी १४५ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. तिच्या या उत्कृष्ट खेळीत १२ चौकारांचा समावेश होता. तिच्या कसोटी कारकिर्दीतील हे केवळ पहिलेच शतक नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीलही तिचे हे पहिलेच शतक आहे.

पहिल्याच चेंडूवर मिळालं होतं जीवदान!

लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या यास्तिकाला तिच्या डावाच्या अगदी पहिल्याच चेंडूवर नशिबाची मोठी साथ मिळाली. इंग्लंडची वेगवान गोलंदाज लॉरेन बेल हिचा एक अप्रतिम चेंडू यास्तिकाच्या ऑफ-स्टंपला जाऊन धडकला. मात्र, नशिबाची साथ एवढी बलवत्तर होती की, चेंडू लागूनही स्टंपवरील बेल्स खाली पडल्या नाहीत आणि ती क्लीन बोल्ड होण्याची वाचली. या मोठ्या जीवदानाचा यास्तिकाने पुरेपूर फायदा उठवला. त्यानंतर तिने एकही चूक न करता अत्यंत संयमाने खेळत ऐतिहासिक शतकाला गवसणी घातली.

Maiden hundred in Test cricket for Yastika Bhatia!! -First hundred by any batsman in women cricket at Lords🔥 -What a knock in second innings!! pic.twitter.com/rVJiw281qS — ALeem ALam (@ALeemALam07) July 12, 2026

The Making Of A Cricketer: वडिलांचा त्याग अन् Yastika ची अपार मेहनत; अशी बनली वडोदराची लेक टीम इंडियाची ‘स्टार’

क्रांती गौडनंतर यास्तिकाने रचला इतिहास

या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतीय महिला खेळाडूंनी लॉर्ड्स मैदानावर आपला दबदबा निर्माण केला आहे. सर्वप्रथम भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड हिने इंग्लंडच्या पहिल्या डावात ५ बळी घेत लॉर्ड्सच्या मानाच्या ‘ऑनर्स बोर्ड’वर (Lords Honors Board) आपले नाव कोरले होते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी यास्तिका भाटियाने शतक झळकावून या बोर्डवर स्थान मिळवले. लागोपाठच्या दोन दिवसांत दोन भारतीय महिला खेळाडूंचे नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर झळकणे ही भारतीय महिला क्रिकेटसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.

भारताची ४०० धावांची आघाडी

यास्तिका भाटियाची ही खेळी अशा वेळी आली जेव्हा भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून सामन्यावर पकड मजबूत करण्याची नितांत गरज होती. तिने मैदानावर संयम आणि आक्रमकता यांचा अप्रतिम ताळमेळ दाखवत इंग्लंडच्या गोलंदाजांना पुरते दमवले. अखेर ७३ व्या षटकात सांघिक २८७ धावांवर असताना सोफी एक्लेस्टोनने यास्तिकाला (११३ धावा) बाद केले. मात्र, पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी तिने भारताची आघाडी ३०० धावांच्या पार पोहोचवून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.

भारताच्या चॅम्पियन खेळाडूंनी घेतला प्रेमानंद महाराज यांचे दर्शन, सोशल मिडियावर Video Viral

Web Title: Yastika bhatia creates history becomes first woman cricketer to score test century at lords marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • cricket news
  • IND W vs ENG W
  • Lord's Cricket Ground
  • Yastika Bhatia

संबंधित बातम्या

Cricket News: ओम शहाच्या भेदक माऱ्यापुढे ‘डीपीईएस’ टीम घायाळ; DSP करंडकमध्ये महाथरार…
1

Cricket News: ओम शहाच्या भेदक माऱ्यापुढे ‘डीपीईएस’ टीम घायाळ; DSP करंडकमध्ये महाथरार…

‘द वॉल’च्या लेकाने मैदानात घातला धुमाकूळ! गुजरातविरुद्ध ठोकल्या 151 रन्स, रुद्रावतार पाहून व्हाल थक्क
2

‘द वॉल’च्या लेकाने मैदानात घातला धुमाकूळ! गुजरातविरुद्ध ठोकल्या 151 रन्स, रुद्रावतार पाहून व्हाल थक्क

IND vs WI: भुवनेश्वर खेळणारच, कुलदीपलाही मिळणार संधी; कशी असणार आज वेस्ट इंडिजविरुद्ध Playing 11
3

IND vs WI: भुवनेश्वर खेळणारच, कुलदीपलाही मिळणार संधी; कशी असणार आज वेस्ट इंडिजविरुद्ध Playing 11

Zimbabwe vs India: पदार्पणातच निकीने दीप्ती शर्मासह रचला इतिहास, 10 वर्ष जुन्या रेकॉर्डवर मात
4

Zimbabwe vs India: पदार्पणातच निकीने दीप्ती शर्मासह रचला इतिहास, 10 वर्ष जुन्या रेकॉर्डवर मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.