झिम्बाब्वे संघ विजयी(फोटो-सोशल मीडिया)
Zimbabwe vs Sri Lanka : श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा सामना झिम्बाब्वेने ५ विकेट्सने आपल्या खिशात टाकला आहे. या विजयासह झिम्बाब्वेने टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरीत साधली आहे. झिम्बाब्वेने श्रीलंकेला ८० धावांवर गारद केले. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील श्रीलंकेची ही त्यांची दसुरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.
हेही वाचा : आशिया कपसाठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच! Dream11 नंतर कोण आहे नवा प्रायोजक? पहा पहिला लुक..
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. कुसल मेंडिस १ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर पथुम निस्सांका देखील ८ धावा काढून बाद झाला. कामिल मिश्राने थोडा प्रतिकार केला पण दुसऱ्या टोकाकडून विकेट मात्र पडत गेल्या.
नुवानिदु फर्नांडो १ धावा माघारी गेला तर कामिंदू मेंडिस खाते न उघडता बाद झाला. २० धावा काढून कामिल मिश्रा देखील बाद झाला. श्रीलंकेने ३८ धावांवरच पाच विकेट गमावल्यानंतर, चारिथ असलंका आणि दासुन शनाका यांनी मिळून सुमारे ३० धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. शनाका १५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर असलंकाही १८ धावा काढून माघारी गेला. श्रीलंकेचा डाव १७.४ षटकांत ८० धावांवर आटोपला. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्स आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, ब्लेसिंग मुजराबानीने २ आणि शॉन विल्यम्सने १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघाने ५ विकेट गमावून सहज हा सामना जिंकला. या विजयाने झिम्बाब्वेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. तथापि, झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली पण मधल्या फळीतील फलंदाजांनी कच खाल्ली. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी २० धावांची भागीदारी रचली. थादिवानाशे मारुमानी १७ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर शॉन विल्यम्स खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर सिकंदर रझा देखील झटपट आऊट झाला. झिम्बाब्वेने २७ धावांवर तिसरी विकेट गमावली होती.
हेही वाचा : Asia cup 2025 : आशिया कपसाठी संघ व्यवस्थापन कुणाला देणार कौल? संजू सॅमसन की जितेश शर्मा? समोर आली मोठी अपडेट
त्यानंतर ब्रायन बेनेट आणि रायन बर्ल यांनी छोटीशी भागीदारी रचत संघाने पुनरागमन केले. ब्रायन बेनेट १९ धावा करून माघारी गेला तर रायन बर्लने नाबाद २० आणि ताशिंगा मुसेकिवाने नाबाद २१ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. झिम्बाब्वेने १४.२ षटकांत ८४ धावा काढून मालिका १-१ अशी बरोबरी साधली. श्रीलंकेकडून दुष्मंथा चामीराने ३ विकेट काढल्या.