संजू सॅमसन आणि जितेश शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Sanju Samson or Jitesh Sharma for Asia Cup 2025?: ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सर्वच ८ संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघ या स्पर्धेसाठी दुबईला पोहोचला आहे. भारतीय संघाचे उपकर्णधारपद शुभमन गिलकडे असणार आहे. भारत आपला पहिला सामना १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळणार आहे. तर दूसरा सामना १४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय यष्टीरक्षक जितेश शर्मा २० महिन्यांनंतर या संघात परतला आहे. त्याचबरोबर, आता अशी माहिती समोर येत आहे की, तो या स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून भारतीय व्यवस्थापनाची पहिली पसंती असण्याची शक्यता आहे.
दुबई आणि अबू धाबी येथे खेळवण्यात येणारा आशिया कप यावेळी टी-२० स्वरूपात खेळला जाणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, महाराष्ट्रातील क्रिकेटर जितेश शर्मा आशिया कपमध्ये भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनपेक्षा आघाडीवर असणार आहे. शुभमन गिलला उपकर्णधार बनवल्यापासून, संजूच्या फलंदाजी क्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
हेही वाचा : सचिन, सेहवागसह ‘या’ दिग्गजांना बाहेरचा रस्ता! दिनेश कार्तिककडून India All-Time T20 Playing XI जाहीर
एका अहवालानुसार, शुक्रवारी सराव सत्रात जितेश शर्माने मैदानात विकेटकीपिंगचा सराव केला आहे. तर संजू सॅमसन उच्च कॅचिंग आणि थ्रोडाऊन करताना दिसून आला. जितेश शर्मा प्रथम आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये पोहोचला होता. त्यामुळे एक स्पष्ट होत आहे की, कदाचित जितेश शर्मा विकेटकीपर म्हणून व्यवस्थापनाची पहिली पसंती असण्याची शक्यता आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा फलंदाजी न करता नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसून आले. तिलक आणि अभिषेक हे भारतीय संघासाठी गरज पडल्यास गोलंदाजीसाठी पर्याय ठरू शकतात.या दोघांकडून यापूर्वी भारतासाठी गोलंदाजी करण्यात आली आहे. दुबई आणि अबू धाबीममधील मैदानावर फिरकीपटूंना जास्त मदत मिळत आली आहे, त्यामुळे दोघेही त्यांच्या गोलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे समजते.
यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १० सप्टेंबरपासून यूएईविरुद्ध पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यूएई मोहम्मद वसिमच्या नेतृत्वात मैदानात उरणार आहे.
हेही वाचा : अखेर BCCI च्या निवडणुकीची तारीख ठरली! ‘या’ पदांसाठी होणार निवडणुका..
त्यानंतर, भारत आपला दुसरा सामना १४ सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर, भारतीय संघ १९ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे ओमानविरुद्ध तिसरा आणि शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर, या स्पर्धेत सुपर-४ सामना खेळला जाणार. सुपर-४ मधील दोन अव्वल संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.