टीम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
भारतीय संघ आशिया कप 2025 स्पर्धेसाठी युएईमध्ये पोहचला आहे. तिथे भारतीय संघ सराव देखील करताना दिसून येत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. भारत १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. अशातच भारतीय संघाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आशिया कपपूर्वी बीसीसीआय आणि ड्रीम इलेव्हन यांच्यातील जर्सी प्रायोजकत्व करार संपुष्टात आला होता. त्यामुळे आता भारताला नवीन प्रायोजक शोधावा लागला,परंतु भारतीय संघाला कुणीच प्रायोजक मिळू शकला नाही. त्यामुळे आता भारतीय संघासाठी नवीन जर्सीवर लाँच करण्यात अली आहे. परंतु आता भारतीय संघाच्या या जर्सीवर केवळ ‘इंडिया’ हेच नाव आहे. टीम इंडिया आता आशिया कप स्पर्धेत प्रायोजकत्वाशिवाय खेळणार आहे. भारतीय संघाच्या नवीन जर्सीचा पहिला लूक समोर आला आहे.
हेही वाचा : सचिन, सेहवागसह ‘या’ दिग्गजांना बाहेरचा रस्ता! दिनेश कार्तिककडून India All-Time T20 Playing XI जाहीर
भारतीय संघाच्या नवीन जर्सीवर डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो असून उजव्या बाजूला डीपी वर्ल्ड आशिया कप 2025 असं लिहिलेलं दिसत आहे. डीपी वर्ल्ड हा आशिया कप 2025 चा प्रायोजक आहे. प्रायोजकाच्या मोकळ्या जागेवर आता ‘इंडिया’ हे नाव लिहिण्यात आले आहे. त्यामुळे टीम इंडियाला नवा प्रायोजक मिळाला नसून तो आता आशिया कप स्पर्धेनंतरच मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यात 2023 मध्ये करार करण्यात आला होता. केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग सुधारणा 2025 मध्ये सुधारणा केल्यानंतर हा करार 6 महिन्याआधीच संपुष्टात आला.
🚨 THE ASIA CUP JERSEY OF TEAM INDIA 🚨 🇮🇳 pic.twitter.com/UVuIHEu5C9
— Johns. (@CricCrazyJohns) September 6, 2025
हेही वाचा : Asia cup 2025 : आशिया कपसाठी संघ व्यवस्थापन कुणाला देणार कौल? संजू सॅमसन की जितेश शर्मा? समोर आली मोठी अपडेट
भारताच्या किर्लोस्कर ग्रुप आणि जपानच्या टोयोटा मोटर कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त उपक्रम असलेल्या टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक बनण्यात रस दाखवल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, बीसीसीआयकडून जर्सी प्रायोजकासाठी 30 ते 40 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या माध्यमातून बीसीसीआयला 400 कोटी अधिक कमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन वर्षांसाठी नव्या प्रायोजकाला इतके पैसे मोजावे लागणार आहेत. यामध्ये 2026 टी20 वर्ल्डकप, 2027 वनडे वर्लडकप आणि 130 सामन्यांमधून 400 कोटींहून अधिक रक्कम मिळण्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयकडून 16 सप्टेंबर रोजी टायटल स्पॉन्सरसाठी बोली लावण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.