 
        
            नवी दिल्ली : काँग्रेसने उत्तरप्रदेशातील हस्तीनापुर मतदार संघासाठी अर्चना गौतम हिला उमेदवारी दिली आहे. तिला जशी उमेदवारी जाहीर झाली तसे तिचे बिकीनी मधील फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.
अर्चना गौतम सांगितले की, आपण असल्या प्रकारामुळे अजिबात घाबरलेलो नाही. मी प्रियांका गांधी यांच्या ‘लडकी हू लड सकती हू’ या आवहानामुळे प्रभावित झाले. त्यामुळे आपण हस्तीनापुरची निवडणुक निर्धाराने लढवणार आहोत असे तिने सांगितले.
यानिमीत्ताने ही २६ वर्षीय मॉडेल प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तिची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप आणि हिंदु महासभेच्या समर्थकांनी तिचे जुने बिकीनीतील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केले आहेत. आज पीटीआयशी बोलताना ती म्हणाली की, मी अशा प्रकारांमुळे अजिबात बिथरून जाणार नाही मी निर्धाराने ही निवडणूक लढवणारच आहे.
सन २०१८ साली झालेली मिस बिकीनी इंडिया स्पर्धा तिने जिंकली होती. ती म्हणाली की या स्पर्धेचे फोटो आणि व्हिडीओ टाकून माझ्या विरोधात प्रचार सुरू झाला असला तरी हे असे होणारच हे मी आता गृहीत धरून चालले आहे.






