
Tech Tips: आधार कार्डमध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं... फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये
आता UIDAI च्या लेटेस्ट अपडेटेड आधार ॲपमध्ये मोबाईल नंबर बदलण्याचा पर्याय थेट होम स्क्रीनवर दिसणार नाही. तर, सर्विस सेक्शनमध्ये जाऊन या पर्यायाची निवड करावी लागणार आहे. इथे यूजर्स त्यांचा मोबाईल नंबर एंटर करून अपडेट प्रोसेस सुरु करू शकणार आहेत. यासाठी ॲपमध्ये देण्यात आलेल्या सूचनांनुसार व्हेरिफिकेशन आणि ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागणार आहे.
नव्या ॲपमध्ये केवळ मोबाईल नंबर बदलण्याचीच सुविधा मिळणार नाही तर आधार संबंधित इतर सर्विस देखील उपलब्ध असणार आहेत, ज्याचा यूजर्स वापरू करू शकतात. तसेच, या ॲपमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या आधारचे व्हेरिफिकेशन सुविधा आणि आपला बायोमॅट्रिक डेटा लॉक किंवा अनलॉक करण्याचा पर्याय मिळणार आहे. ॲपद्वारे आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदलण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत, जाणून घेऊया.
आधार कार्डमध्ये नवीन मोबाईल नंबर जोडण्यासाठी सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये आधार ॲप ओपन करा. जर तुमच्या मोबाईलमध्ये आधार ॲपचे जुने वर्जन असेल तर प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर ते अपडेट करा. यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला 75 रुपये फी भरावी लागणार आहे. विनंती पाठवल्यानंतर आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट होण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत, यूजर्स ॲपद्वारे त्यांच्या विनंत्यांची स्थिती देखील तपासू शकतात.
Ans: UIDAI च्या नवीन आधार ॲपमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ही सुविधा तुमच्या ॲपमध्ये उपलब्ध आहे का, हे अधिकृत ॲपमध्ये तपासा.
Ans: आधार ॲप उघडा, सर्व्हिस सेक्शनमध्ये जा, मोबाईल नंबर अपडेट हा पर्याय निवडा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ७५ रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. अर्ज करण्यापूर्वी UIDAI कडून अधिकृत शुल्काची खात्री करा.