Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम...
इंस्टाग्रामवर सादर करण्यात आलेल्या नवीन अपडेटअंतर्गत यूजर्सना व्हॅलेंटाईन थीम वाले खास फॉन्ट्स आणि टेक्स्ट इफेक्ट्स मिळणार आहेत. व्हॅलेंटाईन थीम वाले खास फॉन्ट्स आणि टेक्स्ट इफेक्ट्स यूजर्स स्टोरी आणि रिल्समध्ये वापरू शकतात. या फॉन्ट्समध्ये अॅनिमेशन आणि डेकोरेशन स्टाईल्स समाविष्ट आहेत. ज्यामुळे शेअर करण्यात आलेली पोस्ट यूजर्सना अधिक चांगली आणि इमोशनल वाटते. याव्यतिरिक्त लव-थीम फोटो स्टिकर फ्रेम देखील जोडण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये हार्ट डिझाईनसह सेल्फी किंवा आठवणींचे फोटो सजवले जाऊ शकतात. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या फीचर्सच्या मदतीने यूजर्स त्यांचे बोलणे, त्यांच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकणार आहेत आणि त्यांची पोस्ट इतर कंटेटपेक्षा वेगळी दिसणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
केवळ व्हॅलेंटाईन थीम वाले खास फॉन्ट्स आणि टेक्स्ट इफेक्ट्सच नाही तर इंस्टाग्रामने यावेळी इंटरॅक्टिव फीचर्सवर देखील त्यांचे लक्ष केंद्रीत केले आहे. स्टोरी कमेंट्समध्ये ‘सिक्रेट फ्रेस’ नावाचे एक फीचर जोडण्यात आले आहे. जेव्हा एखादा यूजर्स कोणत्याही खास शब्दांमध्ये कमेंट करतो तेव्हा स्पेशल एनिमेशन आणि थीम आपोआप अनलॉक होते. यासोबतच कस्टम स्टोरी मेंशन स्टिकर देखील सादर करण्यात आला आहे, ज्यामुळे एखाद्या खास मित्र किंवा पार्टनरला टॅग करणं अधिक सोपं होतं. इंस्टाग्राम नोट्स देखील व्हॅलेंटाईन थीमसह अपडेट करण्यात आले आहे. प्रायव्हेट चॅट्ससाठी व्हॅलेंटाईन डे चॅट थीम जोडण्यात आली आहे, जी डार्क आणि लाईट अशा दोन्ही मोड्समध्ये उपलब्ध आहे.
एडीट्स अॅपमधून व्हिडीओ तयार करणाऱ्या यूजर्ससाठी एक नवीन ऑप्शन जोडण्यात आले आहे. इथे व्हॅलेंटाईन डे फॉन्ट्स, रेडीमेड टेक्स्ट प्रीसेट आणि नवीन साउंड इफेक्ट्स जसे हार्प म्यूजिक आणि हार्टबीट साउंड जोडण्यात आले आहेत. ज्यामुळे रिल्सना रोमँटिक टच मिळणार आहे. एक नवीन स्पीड कंट्रोल फीचर देखील जोडण्यात आले आहे. इंस्टाग्रामवरील हे व्हॅलेंटाईन डे स्पेशल फीचर्स फक्त 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध असतील.






