Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर
Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…
लीक्सनुसार, आयफोन 17 ई मध्ये मागील जनरेशन च्या तुलनेत अधिक चांगली डिझाईन दिली जाऊ शकते. यावेळी आयफोन मॉडेल जास्तस्लिम आणि प्रीमियम डिझाईनसह लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन रंगात लाँच केला जाऊ शकतो. या डिव्हाईसमध्ये 6.1-इंच OLED स्क्रीन असू शकते, ज्यामध्ये डायनॅमिक आईसलँड सपोर्ट दिला जाईल. या मॉडेलमध्ये देखील 60Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगल पिक्सेल 10 ए बाबत रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, हा फोन अधिक यूथफुल आणि कलरफुल अप्रोचसह लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन निळा, हिरवा, लाल आणि काळा रंगात लाँच केला जाऊ शकतो. या डिव्हाईसमध्ये समोरील बाजूला होल-पंच कटआउट असणार आहे. गुगल पिक्सेल 10 ए मध्ये 6.3-इंच AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असू शकतो. ज्यामुळे आगामी आयफोनला टक्कर दिली जाऊ शकते.
परफॉर्मंसबद्दल बोलायचं झालं तर आयफोन 17 ई अधिक दमदार असू शकतो. यामध्ये नवीन A19 चीप दिली जाण्याची शक्यता आहे, जी 3nm टेक्नोलॉजीर आधारित असणार आहे. यासोबतच कंपनीच्या आगामी डिव्हाईसमध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज ऑप्शन मिळू शकतो. गुगल पिक्सेल 10 एमध्ये गुगलचा नवीन टेंसर जी5 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, जो AI फीचर्स आणि कॅमेरा प्रोसेसिंगमध्ये मजबूत असणार आहे. गुगलच्या आगामी आयफोनमध्ये 8GB रॅम आणि अँड्रॉईड 16 आऊट ऑफ द बॉक्स असू शकतो.
आगामी आयफोनमध्ये 25W पर्यंत मॅगसेफ वायरलेस चार्जिंगसह 4005mAh बॅटरी असू शकते. गुगल पिक्सेल 10 एमध्ये 5100mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.
Apple यावेळी सिंगल मात्र पावरफुल कॅमेरा सेंसरसह एंट्री करू शकतो. 48MP रिअर कॅमेरा OIS सह आणि 18MP अपग्रेड केलेला सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी सेंटर स्टेज सपोर्ट असू शकतो. कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये पिक्सेल नेहमीच त्याची ताकद दाखवतो. या आगामी स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा असू शकतो. ज्यामध्ये 48 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स दिला जाणार आहे. डिव्हाईसमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा असू शकतो.
Meta चा मास्टरस्ट्रोक! Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच करणार नवं अॅप, असे असतील फीचर्स
गुगल पिक्सेल 10 ए हा 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. तर आयफोन 17 ई हा 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. पिक्सेल 10a फ्लिपकार्ट आणि गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर आयफोन १७ई अधिकृत अॅपल चॅनेलवरून उपलब्ध असेल.






