Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे

भारतातील ॲपल यूजर्ससाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तब्बल पाच वर्षांनंतर कंपनीने ॲप स्टोअर आणि आयक्लाऊड सेवांसाठी डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याची सुविधा पुन्हा सुरू केली आहे. यामुळे ॲप्स, सब्सक्रिप्शन आणि इतर ॲपल सेवांचे पेमेंट आता अधिक सोपे आणि सोयीस्कर होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2026 | 10:51 AM
Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे

Follow Us
Follow Us:
  • ॲपलने 5 वर्षांनंतर भारतात ॲप स्टोअर आणि आयक्लाऊडसाठी डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटची सुविधा पुन्हा सुरू केली.
  • आरबीआय च्या कार्ड टोकनायझेशन नियमांनुसार पेमेंट सिस्टिम अपडेट केल्यानंतर हा मोठा बदल करण्यात आला.
  • सध्या ही सुविधा मर्यादित यूजर्ससाठी उपलब्ध असून ॲपल पे साठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
टेक कंपनी ॲपलने ॲप स्टोअर आणि आयक्लाऊड पेमेंटसाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याची सुविधा पुन्हा सुरु केली आहे. दिग्गज टेक कंपनीने 5 वर्षांपूर्वी 2021 मध्ये भारतीय रिजर्व बँक (RBI) चे कार्ड टोकनाइजेशन लागू झाल्यानंतर कार्ड पेमेंटची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर यूजर्सना ॲप खरेदी करण्यासाठी किंवा सब्सक्रिप्शनसाठी यूपीआय, नेट बँकिंगसह प्रीपेड ॲपल आयडी बँलेंसचा वापर करावा लागत होता. मात्र आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला असून तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन झाले आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

Recharge Plan Hike: मोबाईल यूजर्सना पुन्हा बसणार झटका! रिचार्ज किंमतीत वाढ होण्याची शक्यता; लाखो ग्राहकांच्या खिशावर पडणार भार

ॲप स्टोअर आणि आयक्लाऊड खरेदीसाठी कार्डद्वारे होणार पेमेंट

आरबीआयच्या कार्ड टोकनायझेशन फ्रेमवर्कमुळे, आता ॲपलच्या ॲप स्टोअर आणि आयक्लाऊड खरेदीसाठी यूजर्स डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकणार आहेत. तथापी, कंपनीने हे पेमेंट सिस्टिम सध्या केवळ मर्यादित यूजर्ससाठी सुरु केले आहे. आता यूजर्सना यूपीआयसोबतच इतर पेमेंट ऑप्शन्स देखील वापरता येणार आहेत. याचा सर्वाच मोठा फायदा म्हणजेच आता यूजर्सना ॲप खरेदी करण्यासाठी किंवा सब्सक्रिप्शनसाठी कोणत्याही एकाच पेमेंट पद्धतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. यासोबतच, ॲपल यूजर्स आता ॲप स्टोअर खरेदी, ॲपमधील पेमेंट, ॲपल म्युझिक, आयक्लाऊड प्लस आणि इतर ॲपल सेवांसाठी डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरू शकतात, तर पूर्वी त्यांच्याकडे फक्त यूपीआय किंवा इंटरनेट बँकिंगचा पर्याय होता.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

5 वर्षांनंतर कार्ड पेमेंटची सुविधा पुन्हा उपलब्ध

टेक कंपनीने भारतात 2021 मध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट करण्याचा पर्याय बंद केला होता. कंपनीने आरबीआय द्वारे टोकनाइजेशन मेनडेट लागू होण्यापूर्वीच ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत, व्यापाऱ्यांना ग्राहकांचे कार्ड डिटेल स्टोअर करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. या पेमेंट डिटेल्सच्या जागी एक विशेष टोकन ठेवणे बंधनकारक होते. मात्र आता कंपनीने त्यांचे पेमेंट सिस्टिम आरबीआयच्या नियमांनुसार अपडेट केले आहे. यामुळे आता यूजर्सना पुन्हा कार्डद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

राक्षसी बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री! 50MP कॅमेरा अन् मिळणार हे दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत

ॲपल पे साठी करावी लागणार प्रतिक्षा

कार्ड पेमेंटचे पुनरागमन झाले असले तरी ॲपल पे बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. कंपनीने भारतातील या डिजिटल पेमेंट सेवेच्या लाँचबाबतची कोणतीही टाईमलाईन अद्याप जाहीर केलेली नाही. काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, आरबीआयच्या ‘टोकनायझेशन’ नियमांचे पालन केल्यानंतर, ॲपलचा हा उपक्रम भारतीय यूजर्ससाठी पेमेंटचा अनुभव अधिक सोपा आणि सोयीस्कर बनवू शकतो. अशा परिस्थितीत, जर हे वैशिष्ट्य आगामी महिन्यांत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले गेले, तर ॲपल इकोसिस्टम वापरणे अधिकच सोपे होईल.

Web Title: After 5 years apple again started debit and credit card payment for app store and icloud in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
1

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
2

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
3

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
4

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.