राक्षसी बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री! 50MP कॅमेरा अन् मिळणार हे दमदार फीचर्स; जाणून घ्या किंमत
नवा स्मार्टफोन 8GB+128GB आणि 8GB+256GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदी करू शकतात. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंटची किंमत PKR 99,999 म्हणजेच सुमारे 34,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB+256GB या व्हेरिअंटची किंमत PKR 1,09,999 म्हणजेच सुमारे 38,000 रुपये ठेवली आहे. डिव्हाईस पाकिस्तानच्या ऑनलाईन स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक मिडनाइट ब्लू आणि पर्ल व्हाइट कलरमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये Q10+ ल्यूमिनसेंट मटीरियल आणि 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP69 रेटिंग दिली आहे.
नवा स्मार्टफोन 6nm ऑक्टा-कोर यूनिसॉक T7300 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 2.0GHz वर चालणारे 6 एफिशिएंसी कोर आणि 2.2GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करणारे दोन परफॉर्मंस कोर मिळणार आहेत. या डिव्हाईसमध्ये ओरिजिनओएस 6 सह अँड्रॉईड 16 मिळणार आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेज देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी वेपर चेंबर कूलिंग सॉल्यूशन देखील मिळणार आहे. जे 4,300 चौरस मिमी उष्णता बाहेर टाकण्याचे क्षेत्र व्यापते.
फोटोग्राफीसाठी या नवीन स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला f/2.4 अपर्चरवाला 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेंसर देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये एलईडी फ्लॅश लाईट देखील मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चरवाला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
स्मार्टफोनमध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,100mAh बॅटरी दिली आहे.






