
Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूक ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
लोक स्वतःचा फोटो टाकून बाप्पाच्या पायाशी बसलेला जुन्या काळातला फोटो बनवत आहेत. एकदम विंटेज, नॉस्टॅल्जिक लूक. भारी गोष्ट म्हणजे यासाठी मोठं-मोठं इंग्रजी प्रॉम्प्ट लिहायची गरज नाही. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवल्या की तुमचा फोटो एका मिनिटात तयार होतो.गेल्या काही दिवसांपासून X आणि इंस्टावर हे रेट्रो फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. गणेशोत्सव आल्यामुळे आता सगळे बाप्पासोबतचा जुन्या स्टाईलचा फोटो बनवत आहेत.भारी विंटेज फोटो बनवण्यासाठी फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवाबऱ्याच वेळा AI मध्ये फोटो टाकला की चेहराच बदलून जातो. तुम्ही वेगळेच दिसायला लागता. असं होऊ नये म्हणून या 4 गोष्टी करा. Prompt
AI चा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तो चेहरा बदलतो. तुम्ही फोटो टाकल्यावर तो काल्पनिक चेहरा बनवतो. त्यामुळे AI ला फोटो देताना एकच ओळ लिहा – “Preserve my exact facial features and identity”. म्हणजे माझा चेहरा जसाच्या तसा ठेव. एवढं लिहिलं की तुमचा ओरिजनल चेहरा राहील.
जुन्या फोटोंमध्ये एक वेगळीच मजा होती. थोडा धूसरपणा, पांढरट-पिवळसर रंग, फोटोवर थोडी चमक. तोच लूक आणण्यासाठी AI टूलमध्ये Vintage Filter किंवा Analogue Film Grain हा ऑप्शन निवडा. त्यामुळे फोटो एकदम आताचा न वाटता, जुन्या अल्बममधून स्कॅन करून काढल्यासारखा वाटेल.
फोटोमध्ये जर तुम्ही टी-शर्ट आणि जीन्स घातली तर सगळी मजा जाईल. 80 च्या दशकातले कपडे हवेत. साधा सुती शर्ट, कुर्ता, महिलांसाठी पारंपारिक साडी आणि जुन्या स्टाईलचे केस. आणि मागचं बॅकग्राउंड पण साधं हवं. पांढरी भिंत, दाराला झेंडूच्या फुलांचं तोरण, कोपऱ्यात पितळी समई. असं असेल तरच खरा 80 चा फील येईल.
हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आजकालच्या मोठ्या, डीजे वाल्या मूर्त्या नकोत. 80 च्या दशकात घरात साधी शाडूच्या मातीची, लाल रंगाची, डोक्यावर छोटा मुकुट असलेली सात्विक मूर्ती असायची. तशीच मूर्ती फोटोमध्ये हवी. तेव्हाच मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या जुन्या घरातल्या गणपतीची आठवण येईल.
यासाठी काही अवघड काम नाही. तुम्ही PixelBin AI Trend Maker वर जा किंवा ChatGPT चं मोबाईल अॅप उघडा.तिथे प्लस (+) च्या बटनावर क्लिक करून तुमचा एक चांगला सेल्फी अपलोड करा. नंतर तिथे असलेल्या 1980s Vintage Template वर क्लिक करा. किंवा वर सांगितलेल्या 4 गोष्टी छोट्या शब्दात लिहा.बस, 10-20 सेकंदात तुमचा बाप्पासोबतचा रेट्रो फोटो तयार. तो डाऊनलोड करा आणि DP ला किंवा स्टेटसला लावा. लोक नक्की विचारतील हा फोटो कुठून आणला.