
Instagram New Feature: Instagram वापरताय? ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Instagram New Feature, Instagram Latest Update: इंस्टाग्राम नेहमी काहीतरी नवीन आणत असतं. रील्स, स्टोरी, नोट्स नंतर आता कंपनीने एक नवीन फीचर आणलं आहे ज्यामुळे तुमचं प्रोफाईल अजून भारी दिसणार आहे.आतापर्यंत काय व्हायचं, कोणीतरी तुम्हाला एखाद्या फोटोमध्ये टॅग केलं की तो फोटो फक्त Tagged वाल्या सेक्शनमध्येच दिसायचा. तुमच्या मेन प्रोफाईल ग्रिडवर तो यायचा नाही. बऱ्याच वेळा मित्रांनी काढलेला भारी फोटो असायचा, पण तो मेन प्रोफाईलवर लावता येत नव्हता. त्यामुळे प्रोफाईल अर्धवट वाटायचं.Instagram New Feature:
पण आता ही अडचण संपली आहे. इंस्टाग्रामने नवीन अपडेट दिलं आहे. आता तुम्हाला टॅग केलेला आवडता फोटो तुम्ही थेट तुमच्या मेन ग्रिडवर आणू शकता. म्हणजे तुमचं प्रोफाईल अजून पर्सनल आणि आकर्षक दिसेल आणि कोणता फोटो दाखवायचा यावर तुमचाच कंट्रोल राहील
इंस्टा उघडा
सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम अॅप उघडा आणि तुमच्या प्रोफाईलवर जा.स्टेप
Tagged सेक्शनमध्ये जा
प्रोफाईलवर गेल्यावर वरती तीन टॅब दिसतात. त्यातला Tagged वाला टॅब, म्हणजे जिथे माणसाचा आयकॉन असतो त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला इतर लोकांनी तुम्हाला टॅग केलेले सगळे फोटो आणि व्हिडिओ दिसतील.
आवडता फोटो निवडा
आता त्या लिस्टमधून जो फोटो तुम्हाला तुमच्या मेन प्रोफाईलवर हवा आहे तो उघडा. एखाद्या लग्नातला, ट्रिपमधला किंवा मित्रांसोबतचा भारी फोटो असेल तर तो निवडा.
प्रोफाईलला अॅड करा
फोटो उघडल्यावर वरती तीन डॉट्स किंवा खाली ऑप्शन्स दिसतील. तिथे तुम्हाला “Add to Profile Grid” किंवा “प्रोफाईल ग्रिडवर दाखवा” असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.झालं, एवढंच करायचं आहे. आता तो फोटो तुमच्या मेन प्रोफाईल ग्रिडवर दिसायला लागेल. कोणीही तुमचं प्रोफाईल उघडलं की त्याला तो फोटो दिसेल.
या फीचरचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमचं प्रोफाईल तुमच्या मनाप्रमाणे सजवता येईल. बऱ्याच वेळा आपले फोटो दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये भारी आलेले असतात. ते आता तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर आणू शकता.
दुसरं म्हणजे तुमचे आणि तुमच्या मित्रांसोबतचे फोटो एकाच ठिकाणी दिसतील. त्यामुळे प्रोफाईल बघायला पण मजा येईल.लक्षात ठेवा, हे फीचर सगळ्यांना एकाच वेळी मिळणार नाही. तुमचं अॅप अपडेट असेल तरच हे ऑप्शन दिसेल. काही अकाउंटला थोडं उशिरा मिळू शकतं. त्यामुळे प्ले स्टोअरमध्ये जाऊन इंस्टाग्राम अपडेट करून बघा.