Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक… कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?

Airtel Recharge Comparison: तुम्ही एअरटेल यूजर आहात का? तुम्ही देखील गोंधळात पडला आहात का, की कोणता प्लॅन खरेदी करावा आणि कोणत्या प्लॅनमध्ये तुम्हाला जास्त फायदे मिळणार आहेत? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. यामध्ये दोन रिचार्ज प्लॅनची तुलना केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2026 | 03:47 PM
Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक... कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?

Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक... कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?

Follow Us
Follow Us:
  • एअरटेलच्या 355 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी 25GB 4G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळतात.
  • एअरटेलच्या 379 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड 5G आणि रोज 100 एसएमएस चा फायदा मिळतो.
  • 379 रुपयांच्या प्लॅनसोबत अ‍ॅपल म्युझिक सब्सक्रिप्शन आणि गूगल वन क्लाउड स्टोरेज मोफत दिले जाते.
Airtel Recharge Plans: भारतातील दुसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल त्यांच्या यूजर्सना अनेक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. प्रत्येक प्लॅनची किंमत आणि यामध्ये मिळणारे फायदे वेगळे असतात. पण आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा दोन रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक आहे. यातील पहिल्या प्लॅनची किंमत आहे 355 रुपये आणि दुसऱ्या प्लॅनची किंमत आहे 379 रुपये. दोन्ही प्लॅन्सची किंमत आणि यामध्ये मिळणाऱ्या फायद्यांमध्ये देखील बराच फरक आहे.

Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच… दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण

प्लॅनची तुलना

379 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5G डेटा ऑफर केला जातो तर 355 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकदाच 4G डेटा वापरता येतो. जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर तुम्ही 379 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. एयरटेलचे 4G आणि 5G नेटवर्क आता सर्वच ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे 5G नेटवर्क उपलब्ध आहे, तर 379 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. मात्र जर तुम्ही 4G नेटवर्कचा वापर करत असाल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात डेटा वापरायचा असेल, तर तुम्ही 355 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. चला, खाली या प्लॅन्सच्या फायद्यांवर अधिक बारकाईने नजर टाकूया.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

भारती एयरटेलचा 355 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

भारती एअरटेलच्या 355 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 25GB 4G डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 300 एसएमएस देखील ऑफर केले जातात. या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. यासोबतच यूजर्सना 5 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळणार आहे. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना दररोज 11.83 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर कंपनीच्या पोर्टफोलिओमधील दुसरा प्लॅन 379 रुपयांचा आहे. दोन्ही प्लॅन्सच्या किंमतीत फार फरक नाही. मात्र दुसऱ्या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे थोडे वेगळे आहे.

भारती एयरटेलचा 379 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

भारती एयरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेल्या 379 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना कोणते फायदे ऑफर केले जातात, याबाबत जाणून घेऊया. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतात. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना डेली 2GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 1 महिन्याची आहे. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना रोज सुमारे 12.63 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: 25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये कोण ठरणार वरचढ? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

प्लॅनसोबत यूजर्सना एका महिन्यासाठी 30GB चे गुगल वन क्लाउड स्टोरेज देखील मोफत मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनसोबत यूजर्सना 6 महिन्यांपर्यंत अ‍ॅपल म्युझिक सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा देखील मिळणार आहे. जर तुम्ही 299 रुपये किंवा 319 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर अडकला असाल आणि तुम्हाला अपग्रेड करण्यासाठी बेस्ट प्लॅन पाहिजे असेल तर 355 रुपये आणि 379 रुपयांच्या प्लॅनचा तुम्ही विचार करू शकता. लक्षात ठेवा की तुम्ही 5G की 4G कोणत्या नेटवर्कचा वापर करत आहात, त्यानुसार प्लॅनची खरेदी करा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Bharti Airtel कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Bharti Airtel ही भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे.

  • Que: Airtel चे 5G नेटवर्क भारतात उपलब्ध आहे का?

    Ans: होय, Airtel चे 5G नेटवर्क भारतातील अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे.

  • Que: Airtel चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन कोणते आहेत?

    Ans: Airtel कडे कमी किंमतीपासून अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि SMS सुविधा असलेले अनेक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत.

Web Title: Airtel rs 355 vs rs 379 price difference is 24 rupees which plan offers more benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं
1

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट
2

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर
3

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.