Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: 25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये कोण ठरणार वरचढ? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना
वनप्लस स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 23,499 रुपये आहे. तर विवो स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. किंमतीच्या बाबतीत विवो स्मार्टफोन ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य – विवो, वनप्लस)
दोन्ही स्मार्टफोन मोठ्या एफएचडी+ एलसीडी डिस्प्लेने सुसज्ज आहे. वनप्लस स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्स ब्राइटनेस मिळणार आहे. तर विवो स्मार्टफोनमध्ये 6.76 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्सची पीक ब्राइटनेस आहे. जास्त स्मूद स्क्रोलिंग आणि गेमिंगसाठी स्मार्टफोन शोधत असाल तर OnePlus चा 144Hz रिफ्रेश रेट तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, प्रखर सूर्यप्रकाशात विवो फोनमध्ये अधिक चांगली दृश्यमानता मिळते. दोन्ही स्मार्टफोन सपाट कडा आणि मॉडर्न लुकसह उपलब्ध आहेत.
फोटोग्राफीमध्ये दोन्ही स्मार्टफोन्स समान पातळीवर आहेत. दोन्ही फोनमध्ये 50MP चा प्राइमरी रियर कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सोशल मीडिया फोटो, व्हिडीओ कॉलिंग, रील्स आणि डेली फोटोग्राफीसाठी दोन्ही स्मार्टफोन्स चांगला अनुभव ऑफर करण्याचा दावा करतात. स्मार्टफोन कॅमेऱ्यामधील खरं फरक मेगापिक्सलपेक्षा जास्त इमेज प्रोसेसिंग आणि कलर ट्यूनिंगमध्ये पहायला मिळू शकतो. काही युजर्सना विवोचे कॅमेरा कलर्स आवडू शकतात तर काही युजर्सना वनप्लसचे नैसर्गिक प्रोसेसिंग अधिक चांगले वाटू शकते.
वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईट मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 एपेक्स प्रोसेसर दिला जातो तर विवो टी 5 एक्स 5G मध्ये डायमेन्सिटी 7400 टर्बो चिप देण्यात आली आहे. दोन्ही प्रोसेसर एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यामुळे स्मार्टफोनचा रोजचा वापर, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि कॅस्युअल गेमिंगमध्ये जास्त फरक जाणवत नाही. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही फोन अँड्राईड 16 वर चालतात. वनप्लसमध्ये ऑक्सीजनओएस 16 दिला आहे तर विवो टी 5 एक्स 5G मध्ये ओरिजिनओएस 6 दिला आहे. ज्या युजर्सना क्लीन आणि हलका इंटरफेस आवडतो त्यांच्यासाठी ऑक्सीजनओएस जास्त चांगला ठरू शकतो. तर ओरिजिनओएस अनेक कस्टम फिचर्ससह येतो.
विवो टी 5 एक्स 5G मध्ये 7,200mAh बॅटरी दिली आहे तर वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईट मध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. विवो स्मार्टफोन 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात आणि सामान्य वापरात देखील दोन दिवस चालू शकते. जर तुम्ही जास्त प्रवास करत असाल आणि वारंवार चार्जिंग करण्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही विवो टी 5 एक्स 5G ची निवडा करू शकता.
जर तुम्हाला मोठी बॅटरी, जास्त मजबूत बॉडी आणि उत्तम आउट डोअर ब्राईटनेस पाहिजे असेल तर तुमच्यासाठी विवो टी 5 एक्स 5G चा पर्याय योग्य ठरणार आहे. मात्र जर तुम्हाला हलक्या वजनाचा फोन, जास्त स्मूथ डिस्प्ले आणि क्लीन सॉफ्टवेअर एक्सपीरियंस पाहिजे असेल तर तुम्ही वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईट ची निवड करू शकता.
Ans: Vivo आणि OnePlus दोन्ही ब्रँड्स चांगले आहेत. कॅमेरा आणि डिझाइनसाठी Vivo तर परफॉर्मन्स आणि क्लीन UI साठी OnePlus प्रसिद्ध आहे.
Ans: गेमिंगसाठी OnePlus स्मार्टफोन अधिक चांगले मानले जातात कारण त्यामध्ये शक्तिशाली प्रोसेसर आणि स्मूथ परफॉर्मन्स मिळतो.
Ans: फोटोग्राफी आणि पोर्ट्रेट मोडसाठी Vivo चे कॅमेरे अधिक लोकप्रिय आहेत.






