Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच... दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण
Oppo A6c स्मार्टफोन भारतात 4GB + 64GB आणि 4GB + 128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाइस सध्या भारतातील ओप्पोच्या ऑनलाइन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक फीदर व्हाईट आणि स्टोन ब्राऊन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Oppo)
कंपनीने लाँच केलेल्या नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे. नव्या ओप्पो स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 900 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे.
नव्या फोनमध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T7250 चिपसेट आहे, ज्यासोबत माली-जी57 जीपीयू आहे. फोनमध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. सुरक्षेसाठी या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, ई-कम्पास आणि एक्सेलेरोमीटर देखील मिळणार आहे.
फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार व्हावा यासाठी Oppo A6c मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये f/2.2 अपर्चर मिळणार आहे, जो 81-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि ऑटोफोकसवाला 13-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्यासह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या डिव्हाइसद्वारे तुम्ही 1080p/30 fps पर्यंतच्या गुणवत्तेत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.
Oppo A6c मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.
Ans: Oppo ही चीनची स्मार्टफोन कंपनी आहे.
Ans: होय, Oppo स्मार्टफोन कॅमेरा, डिझाइन आणि परफॉर्मन्ससाठी लोकप्रिय आहेत.
Ans: होय, Oppo चे SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान खूप प्रसिद्ध आहे.






