अँड्रॉइडवरील Amazon चं अॅप स्टोअर होणार बंद, कंपनीने का घेतला हा निर्णय? जाणून घ्या कारण
Amazon ने त्यांंच्या अँड्रॉईड अॅप स्टोअरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी अॅमेझॉन अँड्रॉइडसाठीचे त्यांचे अॅप स्टोअर बंद करणार आहे. 20 ऑगस्ट रोजी अॅमेझॉनचे अँड्रॉइडसाठीचे अॅप स्टोअर बंद केले जाईल. खरं तर कंपनीने गुगल प्ले स्टोअरला टक्कर देण्यासाठी Amazon अॅप स्टोअर सुरु केलं होतं. मात्र आता कंपनी हे अॅप स्टोअर बंद करणार आहे. कंपनीने डेव्हलपर्सना नोटीस पाठवून सूचित केले आहे की ते आता स्टोअरमध्ये नवीन अॅप्स सबमिट करू शकणार नाहीत.
हरवलेल्या वस्तू शोधणं झालं आणखी सोपं, भारतात लाँच झाला boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर; केवळ इतकी आहे किंमत
कंपनीने एका सपोर्ट पेजवर म्हटले आहे की, ते त्यांचे कॉइन्स डिजिटल चलन देखील बंद करेल, जे अॅप स्टोअरवरून गेम आणि अॅप्स खरेदी करण्यासाठी वापरले जात होते. कंपनीने हा निर्णय का घेतला आहे, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, गुगल प्ले स्टोअरला टक्कर देण्यासाठी Amazon अॅप स्टोअर सुरु करण्यात आलं होतं. कंपनीने 2011 साली हे अॅप स्टोअर सुरु केलं. तर 2021 साली विंडोजसाठी हे अॅप स्टोअर सुरु करण्यात आलं. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीने आता हे अॅप स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
“20 ऑगस्ट 2025 पासून, तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर Amazon App store मध्ये प्रवेश मिळणार नाही. आम्ही 20 ऑगस्ट 2025 रोजी Amazon Coins प्रोग्राम देखील बंद करणार आहोत,” असे कंपनीने सपोर्ट पेजवर म्हटले आहे. 20 ऑगस्टपर्यंत युजर्सकडे असलेली कोणतीही नाणी परत केली जातील असे अॅमेझॉनने म्हटले आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की अॅमेझॉन डिव्हाइसेसच्या बाहेर अॅप स्टोअरचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी होती. त्यामुळे हा अॅप स्टोअर आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे की, “आम्ही आमच्या स्वतःच्या डिव्हाइसेसवरील अॅप स्टोअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अँड्रॉइडवरील अॅमेझॉन अॅप स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण सध्या आमचे बहुतेक ग्राहक त्यात गुंतलेले आहेत.” कंपनीने असेही म्हटले आहे की अॅप स्टोअर अजूनही फायर टीव्ही आणि फायर टॅब्लेटसारख्या स्वतःच्या डिव्हाईसवर कार्यरत राहील. मात्र अँड्रॉईड युजर्स त्याचा वापर 20 ऑगस्टनंतर करू शकणार नाहीत.
Apple ला टक्कर देण्यासाठी Google ची मोठी तयारी, अमेरिकेनंतर आता ‘या’ देशातही सुरु करणार रिटेल स्टोअर
गेल्या वर्षी, मॅकॅफी लॅब्समधील सुरक्षा संशोधकांना असे आढळून आले की अमेझॉन अॅप स्टोअरवरील एक अॅप्लिकेशन मालवेअर पसरवण्यासाठी हेल्थ टूल म्हणून काम करत आहे .
2011 पासून अमेझॉनने गुगलशी स्पर्धा करण्याचा आणि पर्यायी अॅप स्टोअर इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न केला आहे . कंपनीने त्यांच्या अयशस्वी फायर फोन प्रकल्पाला स्वतःच्या अॅप स्टोअरद्वारे चालना देण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षी Amazon ने सांगितले होते की ते 5 मार्च 2025 पासून विंडोजवरील त्यांच्या अॅप स्टोअरचा सपोर्ट बंद करेल, जे अँड्रॉइड अॅप्स ऑफर करत होते. कंपनीने 2021 मध्ये विंडोजसाठी हा प्रोग्राम सुरू केला.