Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple ची ऐतिहासिक झेप! 5 ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप गाठणारी जगातील दुसरी कंपनी

Apple: जागतिक शेअर बाजारात मंगळवारी ॲपलने ऐतिहासिक कामगिरी करत व्यवहारादरम्यान 5 ट्रिलियन डॉलर्स बाजारमूल्याचा टप्पा ओलांडला. शेअरच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप या पातळीवर पोहोचले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 30, 2026 | 12:30 PM
Apple ची ऐतिहासिक झेप! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Apple ची ऐतिहासिक झेप! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ॲपलने व्यवहारादरम्यान 5 ट्रिलियन डॉलर्स बाजारमूल्याचा ऐतिहासिक टप्पा 
  • शेअरच्या विक्रमी वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप उच्चांक
  • दिवसअखेर नफावसुलीमुळे शेअरमध्ये किंचित घसरण
  • तंत्रज्ञान क्षेत्रातील ॲपलचे जागतिक वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित 
Tech News: जागतिक शेअर बाजारात मंगळवारी एक महत्त्वाची घडामोड पाहायला मिळाली. (I-Phone) आयफोन बनवणारी ॲपल कंपनी काही काळासाठी तब्बल 5 ट्रिलियन डॉलर्सच्या(Trillion Dollars) बाजारमूल्याच्या पुढे गेली. हा टप्पा गाठणाऱ्या मोजक्याच कंपन्यांमध्ये आता (I-Phone) ॲपलचाही समावेश झाला आहे. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

कंपनीच्या शेअरची किंमत विक्रमी

व्यवहार सुरू असताना ॲपलच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली. एका टप्प्यावर कंपनीच्या शेअरची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आणि त्यासोबतच कंपनीचे एकूण बाजारमूल्यही 5 ट्रिलियन डॉलर्सच्या वर गेले. मात्र, दिवसअखेर नफावसुलीमुळे शेअरमध्ये थोडी घसरण झाली. त्यामुळे बाजार बंद होताना कंपनीचे मूल्य या आकड्याच्या किंचित खाली आले. तरीही दिवसभरातील ही कामगिरी गुंतवणूकदारांसाठी मोठी सकारात्मक बातमी ठरली.

ॲपलच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी

गेल्या काही महिन्यांपासून ॲपलच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीच्या नवीन उत्पादनांबरोबरच डिजिटल सेवा(Digital Service), सॉफ्टवेअर(Software) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी (AI)संबंधित योजनांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे. याच कारणामुळे यंदा कंपनीच्या शेअरने चांगली वाढ नोंदवली असून अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनाही मागे टाकले आहे.

Google Apps: सावधान! फोनची बॅटरी झपाट्याने संपतेय? Google चे ‘हे’ 5 Apps कारणीभूत

एआयसाठी वापरल्या जाणाऱ्या चिप्सची मागणी

दरम्यान, जगातील सर्वात मौल्यवान कंपनी होण्यासाठी ॲपल(Apple) आणि एनव्हिडिया (Nvidia) यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील वाढत्या मागणीचा मोठा फायदा एनव्हिडियाला झाला होता. एआयसाठी वापरल्या जाणाऱ्या चिप्सची मागणी झपाट्याने वाढल्याने कंपनीने बाजारमूल्यात मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे एनव्हिडियाने काही काळ अव्वल स्थानही कायम ठेवले. 

बाजारात कंपनीबाबत सकारात्मक

मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. ॲपलने पुन्हा एकदा बाजारमूल्यात आघाडी घेतली असून गुंतवणूकदारांचा वाढता प्रतिसाद कंपनीसाठी फायदेशीर ठरत आहे. विशेष म्हणजे आगामी आर्थिक निकालांच्या पार्श्वभूमीवरही बाजारात कंपनीबाबत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शेअरमध्ये (Share Market) आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

जगातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान

एनव्हिडियाची वाढही तितकीच महत्त्वाची मानली जाते. डेटा सेंटर, क्लाउड सेवा आणि एआय तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या उच्च क्षमतेच्या चिप्समुळे कंपनीने जागतिक बाजारात मजबूत स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आजही ती जगातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक मानली जाते. मंगळवारच्या व्यवहारात एनव्हिडियाच्या शेअरमध्येही वाढ झाली, मात्र बाजारमूल्याच्या बाबतीत ती ॲपलच्या मागे राहिली.

मित्रांसोबत ट्रिपचं बिल वाटणं झालं सोपं! Paytm ने आणलं ‘Split Bills’ फीचर, कसं काम करतं ते जाणून घ्या

भविष्यात आणखी मोठा फायदा

विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणंही मोठं यश मानलं जात होतं. आता मात्र जगातील काही आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या 5 ट्रिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचत आहेत. यावरून जागतिक अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञान क्षेत्राचं वाढतं महत्त्व स्पष्ट होतं. विश्लेषकांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट डिव्हाइस, क्लाउड सेवा आणि डिजिटल व्यवसाय या क्षेत्रांमध्ये सातत्याने गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना भविष्यात आणखी मोठा फायदा मिळू शकतो. त्यामुळे ॲपल आणि एनव्हिडिया यांच्यातील ही स्पर्धा पुढील काळात अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Web Title: Apple crosses usd 5 trillion market cap on tuesday trading

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • AI technology
  • Share Market Today
  • Stock market news

संबंधित बातम्या

Share Market Today: आजच्या ट्रेडिंगमध्ये कमाईची संधी? तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी निवडले ‘हे’ महत्त्वाचे शेअर्स
1

Share Market Today: आजच्या ट्रेडिंगमध्ये कमाईची संधी? तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी निवडले ‘हे’ महत्त्वाचे शेअर्स

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! या महत्त्वाच्या शेअर्सवर ठेवा लक्ष, जाणून घ्या सविस्तर
2

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! या महत्त्वाच्या शेअर्सवर ठेवा लक्ष, जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत; या 8 शेअर्सवर तज्ज्ञांचा फोकस, जाणून घ्या सविस्तर
3

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे सकारात्मक संकेत; या 8 शेअर्सवर तज्ज्ञांचा फोकस, जाणून घ्या सविस्तर

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?
4

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.