Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत

OnePlus 16 Launched: वनप्लसने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 9000mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईसची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2026 | 11:14 AM
राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री... तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री... तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • OnePlus 16 स्मार्टफोन चीनमध्ये लाँच
  • नवीन स्मार्टफोन OnePlus 15 ला रिप्लेस करणार
  • स्मार्टफोनच्या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये
OnePlus Smartphone Launched: चीनमध्ये OnePlus 16 हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 15 ला रिप्लेस करणार आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने मागील मॉडेलसारखाच स्क्वेअर शेप रियर कॅमेरा मॉड्यूल दिला आहे. स्मार्टफोनची बॅटरी, डिझाईन आणि चिपसेट अपग्रेड करण्यात आला आहे. या वनप्लस स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये या महिन्यापासून सुरु होणार आहे.

Tech Tips: फोन चोरी झाला? घाबरू नका… लगेच करा ही 3 कामं, नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं

वनप्लस 16 ची किंमत

वनप्लस 16 स्मार्टफोनच्या 12जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,799 म्हणजेच सुमारे 97,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,07,000 रुपये आहे. 16GB + 1TB या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,21,000 रुपये आहे. या फोनची विक्री चीनमध्ये 13 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन टुमॉरोज स्टार, मार्शियन मास्टरपीस आणि डार्क फॉरेस्ट या रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य: OnePlus) 

वनप्लस 16 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

स्मार्टफोनमध्ये 185Hz रिफ्रेश रेटवाला 6.78-इंच फुल-एचडी+ (1,272 x 2,772 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पिक्सेल डेनसिटी 450 पीपीआय, लोकल पीक ब्राइटनेस 2,000 निट्स, 100 टक्के जीसिआय-P3 कलर गॅमट, ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि 3,840Hz पर्यंत पीडब्ल्यूएम डीसी डिमिंग फ्रीक्वेंसीला सपोर्ट करतो. हा फोन IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. वनप्लस 16 स्मार्टफोन डुअल – सिमसह उपलब्ध आहे, जो अँड्रॉईड 17 वर आधारित ओप्पोच्या लेटेस्ट कलरओएस 17 वर चालतो.

चिपसेट

वनप्लस 16 मध्ये क्वालकॉमचा 2nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चिपसेट देण्यात आला आहे. याच्या प्रोसेसरची पीक क्लॉक स्पीड 5.01GHz पर्यंत आहे. यासोबतच या फोनमध्ये ॲड्रेनो 850 जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम, आणि 1TB चे यूएफएस 4.1 स्टोरेज मिळणार आहे. नव्या वनप्लस स्मार्टफोनमध्ये फोन ट्राई-गेमिंग चिप सेटअप – P4 सुपर डिस्प्ले चिप, लिंगक्सी टच चिप, आणि G3 ई-स्पोर्ट्स नेटवर्क देण्यात आले आहे.

कॅमेरा सेटअप

नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो ओप्पो लुमो इमेजिंगला सपोर्ट करतो. यामध्ये 200-मेगापिक्सेल (f/1.6) प्रायमरी शूटर दिला आहे, जो ड्युअल एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 116-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड रियर कॅमेरा आणि 120x डिजिटल झूमवाला 50-मेगापिक्सेल (f/2.6) टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. हा 3X ऑप्टिकल झूमला देखील सपोर्ट करतो. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 4K/60 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

बॅटरी

वनप्लस 16 मध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसह 9,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, बायडू, क्यूझेडएसएस, आणि गॅलिलिओ देण्यात आला आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

Web Title: Oneplus 16 launched in china with 200mp camera and 9000mah battery read price and specifications hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
1

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स
2

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
3

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
4

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.