
मुहूर्त ठरला! या दिवशी होणार Apple चा बहुप्रतिक्षित ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार एंट्री? जाणून घ्या सविस्तर
कंपनीचा आगामी ईव्हेंट 9 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. कीनोट प्रेजेंटेशन भारतीय वेळेनुसार, रात्री 10:30 वाजता सुरु होणार आहे. कंपनी त्यांचा हा आगामी ईव्हेंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि व्हिडीओ स्ट्रिमिंग सर्विसद्वारे लाईव्ह स्ट्रिम करणार आहे. तसेच कंपनीने त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर सरप्राईज अँड शाईन ईव्हेंटसाठी लाईव्हस्ट्रिम आधीच शेड्यूल केली आहे. याशिवाय, यूजर्स ॲपल टिव्ही आणि दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील हा ईव्हेंट पाहू शकणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
What I am seeing: – Shining light = mechanical aperture on the iPhone 18 Pro Max
– Sky Blue color = Possible new iPhone 18 Pro color. https://t.co/MHQ21LmT9U — Mark Gurman (@markgurman) August 26, 2026
टेक कंपनी त्यांच्या आगामी ईव्हेंटमध्ये त्यांच्य पहिला बुक-स्टाइल फोल्डेबल फोन सादर करण्याची शक्यता आहे. हे डिव्हाईस आयफोन अल्ट्रा नावाने सादर केले जाण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसमध्ये सॅमसंगडी फोल्डेबल स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या या पहिल्या फोल्डेबल डिव्हाईससाठी यूजर्स प्रचंड उत्सुक आहेत. आयफोन अल्ट्रा एक वाईड-फोल्डेबल हँडसेट असल्याचे सांगितलं जात आहे. हे डिव्हाईस सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 सारखे असू शकते आणि पासपोर्टसारखा फॉर्म फॅक्टर बनवू शकते.
प्रो मॉडेल्समध्ये ट्रिपल नाही तर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. अधिक चांगल्या थर्मल मॅनेजमेंटसाठी या स्मार्टफोनमध्ये रीडिजाइन्ड मदरबोर्ड लेआउट दिले जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. फोल्डेबलसह कंपनीच्या या आगामी ईव्हेंटमध्ये आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स देखील लाँच केले जाणार आहेत. यावेळी अल्ट्रा मॉडेलसह सर्व स्मार्टफोन्स लेटेस्ट ॲपल सिलिकॉन A20 प्रो चिपसेटने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. आयफोन 18 प्रो सिरीज अगदी मागील मॉडेलीसारखी दिसत आहे. मात्र या फोनमध्ये मोठे कॅमेरा लेंस कटआउट्स पाहायला मिळत आहेत.
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये ब्लूमबर्गच्या मार्क गुरमन यांनी म्हटलं आहे की, ईव्हेंटच्या पोस्टरमध्ये ॲपल लोगोभोवतीचा तेजस्वी प्रकाश आयफोन 18 प्रो मॅक्सच्या यांत्रिक ॲपर्चरचे प्रतिनिधित्व करत असावा. त्याच वेळी, आकाशी निळ्या रंगाचे बॅकग्राउंड आयफोन 18 प्रो सिरीजसाठीच्या नवीन रंगांच्या पर्यायांचे संकेत देत असावी. स्मार्टफोन्सव्यतिरिक्त, कंपनी या ईव्हेंटमध्ये एअरपॉड्स 5 आणि ॲपल वॉच सिरीज 12 देखील सादर करू शकते. वॉच सिरीज 12 मध्ये जास्त पावरफुल चिपसेटच्या बाबतीत एक मोठे इंटरनल अपग्रेड मिळू शकते, अशी चर्चा सुरु आहे. हे स्मार्टवॉच नवीन हेल्थ फीचर्सने सुसज्ज असू शकते.