फोटो सौजन्य - सोशल मिडीया
आपण आपल्या अनेक कामांसाठी Adobe चा वापर करतो. Adobe च्या वेगवेगळ्या फीचर्समुळे आपली कामं अगदी सहज होतात. मात्र Adobe वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने Adobe च्या 29 सॉफ्टवेअर आणि सेवांबाबत एक अलर्ट जारी केला आहे. Adobe सारख्या अनेक सॉफ्टवेअरमध्ये गंभीर धोका असल्याचे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने सांगितले आहे. यामध्ये Adobe Photoshop, ColdFusion आणि Creative Cloud सारख्या लोकप्रिय ॲप्सचा समावेश आहे. तुम्ही देखील या अॅप्सचा वापर करत असाल तर तुमचा डेटा हॅक होण्याची शक्यता आहे.
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने Adobe सॉफ्टवेअरची चाचणी केली. या चाचणी दरम्यान Adobe Photoshop, ColdFusion आणि Creative Cloud सारख्या लोकप्रिय सॉफ्टवेअर वापरणे धोकादायक असल्याचे आढळले. Adobe Photoshop, ColdFusion आणि Creative Cloud या सॉफ्टवेअरमध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. ज्यामुळे तुमचा डेटा हॅक होण्याची शक्यता आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, Adobe Photoshop, ColdFusion आणि Creative Cloud या सॉफ्टवेअरमध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. ज्यामुळे हॅकर्स तुमच्या फोनवर किंवा कंम्युटरवर नियंत्रण मिळवून तुमचा डेटा हॅक करू शकतात.
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने काही सॉफ्टवेअरची यादी प्रसिध्द केली आहे, ज्यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने वापरकर्त्यांना सल्ला दिला आहे की, जे वापरकर्ते वरील सॉफ्टवेअरचा वापर करत असतील त्यांनी त्या सॉफ्टवेअरचे नवीन वर्जन वापरावे. ज्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहील .