Flipkart - Amazon सेलमध्ये खरेदी करण्याचा प्लॅन बनवताय? या टिप्स ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर, शॉपिंग होईल आणखी मजेदार
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart आणि Amazon ने त्यांच्या आगामी सेलची घोषणा केली आहे. 23 सप्टेंबरपासून दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेल सुरु होणार आहे. घरगुती वस्तूंपासून गॅझेटपर्यंत अनेक वस्तूंवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. त्यामुळे लोकं दिवाळी आणि नवरात्रीसाठी देखील शॉपिंग करू शकणार आहेत. सेल आणि ऑफर्सचं नाव ऐकताच लोकं उत्सुक होतात आणि खरेदीला सुरुवात करतात.
ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शॉपिंग करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरेजंच आहे. विशेषत: जेव्हा सेल सुरु असेल, अशावेळी घाई, गडबड न करता विचारपूर्वक शॉपिंग करणं महत्त्वाचं आहे. काही लोकं ऑफर्स आणि डिस्काऊंटमुळे अशा अनेक वस्तूंची खरेदी करतात, ज्याची त्यांना गरज नाही. अनेकदा सेलमध्ये शॉपिंग करताना निष्काळजीपणा केला जातो. मात्र यामुळे आपलंच नुकसान होतं. याच कारणामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जेव्हा तुम्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह शॉपिंग करणार असाल अशावेळी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑनालईन शॉपिंगमध्ये अनेकदा वेगवेगळ्या वेबसाईट्सवर सामानाच्या वेगवेगळ्या किंमती दिलेल्या असतात. त्यामुळे सेलमध्ये खरेदी करण्यापूर्वी दोन ते तीन वेबसाईट्सची तुलना करा. तसेच तुम्ही तुमच्या जवळील दुकानात जाऊन देखील वस्तूंच्या किंमतीची तुलना करू शकता. ज्या ठिकाणी किंमत कमी असेल तिथून खरेदी करा.
ऑनलाइन शॉपिंगदरम्यान खरेदी करण्यापूर्वी वस्तूचे रिव्यू आणि रेटिंग तपासा. इलेक्ट्रॉनिक्स आणि महागडे गिफ्ट्स खरेदी करण्यापूर्वी रिव्यू तपासणं अत्यंत गरेजंच आहे. यामुळे तुम्हाला खराब प्रोडक्ट आणि चांगल्या प्रोडक्टमधील फरक समजेल आणि तुमचं नुकसान देखील होणार नाही.
फेस्टिव्ह सेल दरम्यान ऑनलाइन शॉपिंग करताना सर्वात आधी बजेट तयार करा. तुम्हाला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, याची यादी तयार करा. तसेच या सर्व वस्तू खरेदी करताना बिल कितीपर्यंत झाले पाहिजे याचा देखील विचार करा. बजेट तयार केल्याने अनावश्यक खर्च टाळला जाऊ शकतो. गरेजच्या वस्तूंची खरेदी करता येईल.
ऑनलाइन शॉपिंगवेळी स्मार्टफोन अॅप्सचा वापर करा. ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कॅशबॅक आणि डिस्काउंट ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. स्टॉक नोटिफिकेशन आणि न्यूज लेटरमधून सतत माहिती मिळवा. गरजेच्या वस्तूंची यादी तयार करा आणि सर्वात आधी याच वस्तूंची खरेदी करा. ज्यामुळे तुम्हाला अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मदत होणार आहे.
अनेकजण फेस्टिवल सीजनमध्ये क्रेडिट कार्डचा वापर करतात. परंतु वेळेवर बिल न भरल्याने व्याज आणि ईएमआयचा भार पडू शकतो. म्हणून, खरेदीसाठी रोख रक्कम किंवा डेबिट कार्ड वापरणे महत्वाचे आहे.
फेस्टिव्हल सीजनमधील प्रत्येक ऑफर तुमच्यासाठी फायद्याची असेलच असं नाही. त्यामुळे विचार करून खरेदी करा आणि ऑफर्स आणि डिस्काऊंटवर लक्ष द्या.