लवकरच सुरु होणार Flipkart-Amazon फेस्टिव्ह सेल! शॉपिंग करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठा Scam
येत्या काही दिवसांतच नवरात्री सुरु होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच दिवाळी साजरी केली जाणार आहे. या दिवसांत लोकं मोठ्या प्रमाणात शॉपिंग करतात. याच काळात सुरु होतात फेस्टिव्ह सिझन सेल. फेस्टिव्ह सिझन सेलदरम्यान अनेक शॉपिंग प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी देतात. यावेळी फेस्टिव्ह सिझन सेल 23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर सुरू होणार आहे. यामध्ये लाखो लोकांना नवीन गॅझेट्स, फॅशन आणि ब्यूटी प्रोडक्ट्स इत्यादी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी देतात.
iPhone 18 Pro Max बाबत समोर आले अपडेट्स, होऊ शकतात हे मोठे बदल! कॅमेऱ्याचा लूकही बदलणार…
ही संधी केवळ शॉपिंग करणाऱ्यांसाठीच नाही तर सायबर गुन्हेगारांसाठी देखील आहे. या सेलदरम्यान सायबर गुन्हेगार सामान्य लोकांची फसवणूक करतात. सेलदरम्यान सायबर गुन्हेगार लोकांना वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
ऑनलाईन शॉपिंग दरम्यान लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर अटॅकर्स खोट्या वेबसाईट तयार करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खोट्या वेबसाईट अगदी खऱ्याप्रमाणे दिसतात. ज्याक्षणी तुम्ही या खोट्या वेबसाईटवर तुमची माहिती अपलोड करता, त्याक्षणी ही सर्व माहिती सायबर अटॅकर्सकडे जाते. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स चुकीच्या हातात जाण्याचा धोका आहे, त्यानंतर काही क्षणातच तुमचं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक कंपन्या त्यांच्या प्रोडक्ट्सची विक्री करण्यासाठी ईमेल मार्केटिंगची मदत घेतात. फसवणूक करणारे देखील याच पद्धतीचा वापर करतात. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी खोट्या ईमेल्सची मदत घेतात. सायबर गुन्हेगार लोकांना आकर्षक ईमेल पाठवतात, अशाच ईमेल्सना लोकं भुलतात आणि त्यांची मोठी फसवणूक होते. जेव्हा लोकं या ईमेल्सना भुलतात आणि ईमेलमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करतात, तेव्हा युजरची संपूर्ण माहिती सायबर गुन्हेगारांकडे जाते आणि या माहितीचा चुकीचा उपयोग होण्याची देखील शक्यता आहे.
कधीही ऑनलाईन शॉपिंग करताना पब्लिक वाय-फायचा वापर करू नका. खरं तर पब्लिक वाय-फायवरील सुरक्षा अत्यंत कमी असते, याचाच फायदा हॅकर्स घेऊ शकतात. हॅकर्स तुमचा क्रेडिट कार्ड नंबर आणि इतर माहिती चोरण्यासाठी पब्लिक वाय-फायचा सारख्या असुरक्षित नेटवर्कचा वापर करू शकतात.
ऑनलाईन शॉपिंग करताना प्रीपेड क्रेडिट कार्डचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण म्हणजे प्रीपेड कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसतात. अशा परिस्थितीत, हॅकर्सना जरी या कार्डमध्ये प्रवेश मिळाला तरी ते फक्त या कार्डमध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करू शकतील. बँकेत ठेवलेले तुमचे पैसे सुरक्षित राहतील.