Flipkart Big Billion Days: 50000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा iPhone 16; ऑफर आणि डिस्काउंटबद्दल जाणून घ्या
फ्लिपकार्ट फेस्टिव सीजन सेल Big Billion Days दरम्यान iPhone 16 वर जबरदस्त डील ऑफर केली जात आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या iPhone 16 वर आता मोठं डिस्काउंट ऑफर केलं जात आहे. बँक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेला आयफोन 16 आता 50 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये आयफोन 16 अगदी कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टच्या अपकमिंग सेलमध्ये स्मार्टफोन डील माइक्रोसाइटवर iPhone 16 ची किंमत 51,999 रुपये होणार आहे. त्यामुळे ही बेस्ट ऑफर असणार आहे. चला तर फ्लिपकार्टच्या सेलबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
Flipkart च्या फेस्टिव सीजन सेलदरम्यान iPhone 16 अगदी कमी किंमतीत उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट (3,653 रुपयांपर्यंत) आणि फ्लिपकार्ट एसबीआय कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट (2,600 रुपयांपर्यंत) उपलब्ध आहे. यासोबतच तुमचे जुने डिव्हाईस एक्सचेंज केल्यास एडिशनल डिस्काउंट देखील दिलं जाणार आहे. जर तुम्ही iPhone 15 एक्सचेंज केला तर तुम्हाला 27,000 रुपये आणि iPhone 14 वर 24,000 रुपयांची सूट मिळत आहे.
खरं तर iPhone 16 ला कंपनीने 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. त्यानंतर अलीकडेच कंपनीने त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच केली आहे. या लाँचिंगनंतर iPhone 16 ची किंमत कमी करण्यात आली. सेल दरम्यान, फ्लिपकार्ट या मॉडेलवर अधिक ऑफर देत आहे, त्यानंतर हे डिव्हाईस 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.
जर तुम्ही फ्लिपकार्ट सेलदरम्यान iPhone 16 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक सुवर्णंसधी आहे. 22 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट ब्लॅक मेंबरशिपसह iPhone 16 खरेदी करा. फक्त पार्टनर बँक कार्डने पैसे द्या. गेल्या काही वर्षांत, विक्रीच्या पहिल्या दिवसानंतर फ्लिपकार्टने त्याच्या आयफोन लाइनअपची किंमत वाढवल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागले आहे.
Flipkart च्या फेस्विट सीजन सेल दरम्यान iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max वर देखील डिस्काऊंट दिलं जाणार आहे. माइक्रो साइटवर iPhone 16 Pro हा 74999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. यावर 5000 रुपयांची बँक सूट आहे, त्यानंतर किंमत 69,999 रुपयांपर्यंत कमी होते. iPhone 16 Pro Max ची सेल प्राइज 94,999 रुपये झाली आहे. या आयफोनच्या खरेदीवर देखील 5000 रुपयांचे बँक डिस्काऊंट देखील दिलं जात आहे. म्हणजेच या आयफोनची किंमत 89,999 रुपये झाली आहे.