Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप

Gaming Smartphone Buying Tips: आजकाल मोबाईल गेमिंगची क्रेझ वाढत असून योग्य गेमिंग स्मार्टफोन निवडणं खूप महत्त्वाचं ठरत आहे. चुकीचा फोन घेतल्यास गेमिंग अनुभव खराब होऊ शकतो, त्यामुळे फीचर्सकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 19, 2026 | 02:39 PM
Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप

Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप

Follow Us
Follow Us:
  • गेमिंगसाठी दमदार प्रोसेसर आणि जीपीयू असलेला स्मार्टफोन निवडल्यास हाय फ्रेम रेट आणि स्मूथ परफॉर्मन्स मिळतो.
  • 120Hz किंवा त्यापेक्षा जास्त रिफ्रेश रेट आणि अमोलेड डिस्प्ले गेमिंगचा व्हिज्युअल अनुभव अधिक उत्तम बनवतात.
  • मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि चांगली कूलिंग सिस्टम गेमिंग दरम्यान ओव्हरहिटिंग टाळून दीर्घकाळ खेळण्यास मदत करतात.
सध्याच्या काळात मोबाईल गेमिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. ब्लॉगिंग, रिल्स, फोटोग्राफी या सर्वांसोबत सध्याचा तरूणवर्ग मोबाईल गेमिंगकडे देखील जास्त आकर्षित आहे. तुम्हाला देखील मोबाईल गेमिंग आवडत असेल आणि तुम्ही गेमिंगसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बाजारात गेमिंग स्मार्टफोन्सचे पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचे बजेट आणि तुमची गरज लक्षात घेऊन स्मार्टफोन खरेदी करणं अत्यंत गरजेचं आहे. गेमिंग स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे अन्यथा तुमचा गेमिंग अनुभव पूर्णपणे खराब होऊ शकतो, याबाबत जाणून घेऊया.

लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स

गेमिंग स्मार्टफोन खरेदी करताना या गोष्टींकडे लक्ष द्या

प्रोसेसर आणि जीपीयू

तुम्ही खरेदी करत असलेल्या गेमिंग स्मार्टफोनचा प्रोसेसर दमदार असणं अत्यंत गरजेचं आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन सीरीज किंवा मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 सीरीजवाला प्रोसेसर असेल तर तुमचा गेमिंग अनुभव अधिक चांगला होऊ शकतो. प्रोसेसरसह जीपीयू देखील पावरफुल असणं तितकंच गरजेचं आहे. जर जीपीयू पावरफुल असेल तर तुम्हाला हाय फ्रेम रेट मिळणार आहे आणि गेम अडकणार नाही. यासाठी नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्हाला बेस्ट गेमिंग अनुभव पाहिजे असेल तर या दोन्ही फीचर्समध्ये कोणताही तडजोड करू नका. (फोटो सौजन्य – Pinterest) 

डिस्प्ले क्वालिटी आणि रिफ्रेश रेट

विजुअल्स चांगले असतील तर गेमिंगचा मजा नक्कीच दुप्पट होणार आहे. यासाठी एमोलेड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन निवडा. यामध्ये जास्त विविड कलर्स मिळतात. एलसीडी डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनमध्ये अशी मजा मिळणं थोडं कठीण आहे. याशिवाय तुम्ही खरेदी करत असलेल्या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट देखील हाय असणं गरजेचं आहे. गेमिंगसाठी 120Hz पेक्षा कमी रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेची निवड करू नका. जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर रेसिंग किंवा शूटिंग गेम्स खेळत असाल, तर फोनचा टच सॅम्पलिंग रेट देखील जास्त असायला हवा.

बॅटरी

मोबाईलवर गेमिंग खेळण्याचा अर्थ फोनची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागणं. यासाठी नेहमी अशा स्मार्टफोनची निवड करा ज्यामध्ये मोठी बॅटरी असेल. सध्या टेक कंपन्या असेच स्मार्टफोनवर लाँच करण्यावर भर देत आहेत, ज्यामध्ये 10,000mAH पर्यंत तगडी बॅटरी ऑफर केली जाईल. असे स्मार्टफोन गेमिंगसाठी चांगली निवड ठरू शकतात. पावरफुल बॅटरीसह फास्ट चार्जिंग ऑप्शन देखील तितकाच महत्त्वाचा आहे. बाजारात असे देखील काही स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 100W पर्यंत फास्ट चार्जिंग ऑफर केली जाते.

ChatGPT Down : AI चॅटबोट अचानक झाले डाऊन, यूजर्सच्या समस्या वाढल्या! कामं झाली ठप्प

कूलिंग सिस्टम

स्मार्टफोन गेमिंग हे एक हेवी टास्क आहे. यामुळे फोनमध्ये अधिक हीट जनरेट होते. जर गेमिंग दरम्यान फोन वारंवार ओव्हरहिट होत असेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा स्मार्टफोनची निवड करा ज्यामध्ये दमदार कूलिंग सिस्टम ऑफर केली जात असेल. कूलिंग सिस्टममुळे फोन गरम होत नाही. त्यामुळे व्हेपर चेंबर कूलिंग किंवा लिक्विड कूलिंगसारखी वैशिष्ट्ये असलेला फोन निवडा.

Web Title: Are you also planning to buy new gaming smartphone check these important features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire MAX: ‘समर रिंग’ इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
1

Free Fire MAX: ‘समर रिंग’ इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

मुसळधार पावसात मुंबईकरांना ‘Vi’चा दिलासा; ‘वी’ स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा
2

मुसळधार पावसात मुंबईकरांना ‘Vi’चा दिलासा; ‘वी’ स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित
3

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
4

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.