Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुना Smartphone विकताय? सर्वात आधी आवर्जून करा ही 4 कामं; नाहीतर वैयक्तिक डेटा होऊ शकतो लीक

Smartphone Tips: जुना स्मार्टफोन विकण्यापूर्वी काही महत्त्वाची कामं पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचा डेटा चुकीच्या हातात जाऊ शकतो आणि तुमच्या वैयक्तिक डेटाचा गैरवापर केला जाऊ शकतो. सर्वात आधी फोनमधील सर्व डेटाचा बॅकअप घेणं गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2026 | 07:03 AM
जुना Smartphone विकताय? सर्वात आधी आवर्जून करा ही 4 कामं; नाहीतर वैयक्तिक डेटा होऊ शकतो लीक

जुना Smartphone विकताय? सर्वात आधी आवर्जून करा ही 4 कामं; नाहीतर वैयक्तिक डेटा होऊ शकतो लीक

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोन विकण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रांचा बॅकअप घेणे अत्यावश्यक आहे.
  • गूगल, अ‍ॅपल, बँकिंग आणि यूपीआय अकाउंट्समधून लॉगआउट करून संवेदनशील माहिती हटवणे गरजेचे आहे.
  • फॅक्टरी रिसेट केल्याने फोनमधील वैयक्तिक डेटा पूर्णपणे हटवून प्रायव्हसी सुरक्षित ठेवता येते.
Smartphone Selling Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी करणं आणि जुना स्मार्टफोन विकणं किंवा एक्सचेंज करणं सध्याच्या काळात अतिशय सामान्य गोष्ट आहे. मात्र स्मार्टफोन विकताना काही लोकं अतिशय सामान्य चुका करतात तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे स्मार्टफोनमधील डेटा योग्य पद्धतीने डिलीट होत नाही आणि यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. तसेच यूजर्सच्या सामान्य चुकांमुळे बँक फ्रॉड, अकाऊंट हॅकिंग आणि ओळख चोरीसारख्या घटना घडू शकतात.

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट्सपासून ईमेल, बँकिंग अ‍ॅप्स, पासवर्ड आणि सोशल मीडिया लॉगिनपर्यंत आपली सर्व माहिती स्मार्टफोनमध्ये सेव्ह असते. जर हा डेटा तुम्ही स्मार्टफोनमधून योग्य पद्धतीने डिलीट केला नाही आणि हा डेटा एखाद्या चुकीच्या हाती लागला तर अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे स्मार्टफोन विकण्यापूर्वी किंवा एक्सचेंज करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण कामं करणं गरजेचं आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

सर्वात आधी डेटा बॅकअप घ्या

फोनमधील सर्व डेटा डिलीट करण्यापूर्वी बॅकअप घेणं गरजेचं आहे. सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमधील सर्व महत्त्वाचा डेटा एका सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा. फोनमधील डेटा सेव्ह करण्यासाठी गुगल ड्राइव्ह, आयक्लॉड किंवा वनड्राइव्ह सारख्या क्लाऊड स्टोरेजचा वापर करू शकता. फोनमधील डेटा लॅपटॉप/हार्ड ड्राइवमध्ये ट्रांसफर करू शकता. यामुळे तुमच्या आठवणी आणि महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित राहतील आणि नंतर कोणतीही अडचण येणार नाही.

सर्व अकाउंट्समधून लॉगआउट करायला विसरू नका

फोनमधून सर्व डेटा डिलीट करणं पुरेसं नाही. अकाऊंटमधून लॉगआउट करणं देखील गरजेचं आहे. अँड्रॉईड यूजर्ससाठी गूगल अकाऊंटमधून साईन आऊट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. फाईंड माय डिव्हाईस बंद करा. सर्व संबंधित अकाऊंट्स डिलीट करा. जर तुम्ही आयफोन यूजर असाल तर अ‍ॅपल आयडीमधून लॉगआऊट करा. फाईंड माय आयफोन बंद करा. डिव्हाइसमधून आयक्लाऊड अकाऊंट काढून टाका. ही स्टेप वगळल्यास नवीन यूजरला फोन सक्रिय करताना अडचण येऊ शकते.

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! चॅट ओपन करताच दिसणार नाहीत वैयक्तिक मेसेज… लवकरच येणार Blur Spoiler Tool

बँकिंग आणि यूपीआय अ‍ॅप्स डिलीट करा

तुमच्या स्मार्टफोनमधील बँकिंग आणि पेमेंट अ‍ॅप्स सर्वात जास्त संवेदनशिल असतात. त्यामुळे स्मार्टफोनमधील हे अ‍ॅप्स डिलीट करणं आणि यामधील सर्व माहिती हटवणं गरजेचं आहे. बँकिंग अ‍ॅप्समधून लॉगआउट करा. यूपीआय आणि डिजिटल वॉलेट अकाऊंट बंद करा. सेव्ह करण्यात आलेले पासवर्ड देखील डिलीट करा. केवळ अ‍ॅप्स अनइंस्टॉल केल्यास डेटा पूर्णपणे हटवला जात नाही, त्यामुळे लॉगआऊट करणं देखील गरजेचं आहे.

फॅक्ट्री रिसेट करा

जेव्हा संपूर्ण बॅकअप आणि लॉगआउट पूर्ण होईल, त्यावेळी फॅक्ट्री रिसेट करा. यामुळे फोनमधील सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट होईल. अ‍ॅप्स आणि सेटिंग्ज हटवली जाईल. अकाऊंट आणि सिस्टिम डेटा पूर्णपणे पुसून टाकला जातो. अधिक चांगल्या सुरक्षेसाठी, कोणताही डेटा शिल्लक राहणार नाही याची खात्री करण्यासाठी काही लोक हे दोनदा देखील करतात.

Web Title: Are you also planning to sell you old smartphone do not forget these essential steps to protect your personal data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 07:03 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

अरे देवा! Aadhaar Card हरवलं? आधार नंबर सुद्धा आठवत नाही? काळजी करू नका… आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस
1

अरे देवा! Aadhaar Card हरवलं? आधार नंबर सुद्धा आठवत नाही? काळजी करू नका… आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
2

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Smartphone Charging Rule: स्मार्टफोनच्या 80% चार्जिंग नियमाचे सत्य काय? बॅटरी हेल्थ खरंच सुधारते का? तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा
3

Smartphone Charging Rule: स्मार्टफोनच्या 80% चार्जिंग नियमाचे सत्य काय? बॅटरी हेल्थ खरंच सुधारते का? तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! चॅट ओपन करताच दिसणार नाहीत वैयक्तिक मेसेज… लवकरच येणार Blur Spoiler Tool
4

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! चॅट ओपन करताच दिसणार नाहीत वैयक्तिक मेसेज… लवकरच येणार Blur Spoiler Tool

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.