WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! चॅट ओपन करताच दिसणार नाहीत वैयक्तिक मेसेज... लवकरच येणार Blur Spoiler Tool
मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचे करोडो यूजर्स आहेत. याच करोडो यूजर्सची सुरक्षा टिकून राहावी यासाठी कंपनी एका नवीन फीचरवर काम करत आहे. या नव्या फीचरचा उद्देश यूजर्सचे वैयक्तिक संभाषण आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या लोकांच्या नजरेपासून वाचवण्याचा आहे. लीक्सवर विश्वास ठेवला तर, कंपनी व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर स्पॉइलर मेसेज या नावाने सादर करू शकते. या फीचरच्या मदतीने यूजर्स एखादा मेसेज किंवा टेक्स्ट ब्लर करू शकतात. जेव्हा रिसीव्हर या मेसेजवर टॅप करेल तेव्हाच तो मेसेज दिसणार आहे.
जेव्हा तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या फोनच्या स्क्रीनवर दिसणारे मेसेज कोणी वाचू नये, तर अशा परिस्थितीत तुम्ही या फीचरचा वापर करू शकता.
मिळालेल्या माहितीनुसार, हा पर्याय व्हॉट्सअॅपच्या टेक्स्ट फॉर्मेटिंग टूल्ससह उपलब्ध केला जाणार आहे. याचा वापर करण्याची प्रोसेस अत्यंत सोपी असणार आहे. सर्वात आधी नेहमीप्रमाणे चॅट बॉक्समध्ये तुमचा मेसेज टाईप करा. आता या मेसेजवर दिर्घकाळ क्लिक करा आणि मेसेज सिलेक्ट करा. आता स्क्रीनवर कट, कॉपी आणि पेस्ट सारखे पर्याय दिसतील. याव्यतिरिक्त तीन डॉट देखील दिसतील. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या तीन डॉटवर टॅप करा.
आता तुम्हाला स्क्रीनवर बोल्ड, इटॅलिक आणि मोनोस्पेस सारखे पर्याय दिसणार आहेत. यामध्येच तुम्हाला स्पॉइलर मोडचा पर्याय देखील दिसेल. हा पर्याय निवडल्यानंतर तुमचा मेसेज ब्लर फॉर्मेटमध्ये बदलणार आहे. जेव्हा तुम्ही असा मेसेज पाठवता, तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला अस्पष्ट दिसेल. मेसेज वाचण्यासाठी, त्यांना त्यावर टॅप करावे लागेल, त्यानंतरच संपूर्ण मजकूर दिसेल. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरमुळे यूजर्सच्या प्रायव्हसीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. विशेषत: जेव्हा यूजर्सना सार्वजनिक ठिकाणी एखाद्या खाजगी विषयावर बोलायचे असेल अशावेळी हे फीचर फायद्याचे ठरणार आहे.
Ans: व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे, ज्याद्वारे मेसेज, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि कॉल्स करता येतात.
Ans: Meta Platforms या कंपनीच्या मालकीचे व्हॉट्सअॅप आहे.
Ans: होय, व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी मोबाईल डेटा किंवा Wi-Fi इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते.






