Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकेचा SMS की सायबर गुन्हेगारांचा नवा डाव? बनावट मेसेज ओळखण्याची ही आहे सोपी ट्रिक, एका मिनिटात समजेल सत्य

सायबर गुन्हेगार बनावट बँक एसएमएस पाठवून ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही सोप्या पद्धतींच्या मदतीने हा संदेश खरा आहे की बनावट, हे तपासता येऊ शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2026 | 07:00 AM
बँकेचा SMS की सायबर गुन्हेगारांचा नवा डाव? बनावट मेसेज ओळखण्याची ही आहे सोपी ट्रिक, एका मिनिटात समजेल सत्य

बँकेचा SMS की सायबर गुन्हेगारांचा नवा डाव? बनावट मेसेज ओळखण्याची ही आहे सोपी ट्रिक, एका मिनिटात समजेल सत्य

Follow Us
Follow Us:
  • 1909 वरून एसएमएसमधील हेडर तपासून तो नोंदणीकृत आहे की नाही, याची माहिती मिळवता येते.
  • ट्रायच्या एसएमएस हेडर पोर्टलवरून हेडर कोणत्या संस्था किंवा कंपनीशी संबंधित आहे, हे तपासा.
  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँक तपशील कोणासोबतही शेअर करू नका.
सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करत असतात. अनेकदा सायबर गुन्हेगार सरकारी किंवा बँकेचे अधिकारी बनून सर्वसामान्यांना फोन करतात आणि त्यांची वैयक्तिक माहिती किंवा बँक डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न करतात. तसेच, अनेकदा सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी खोटे बँक अलर्ट आणि एसएमएस देखील पाठवतात. हे बँक अलर्ट आणि एसएमएस हुबेहुब खऱ्या बँकेनी पाठवले आहेत, असेच वाटतात. यामधील विषय, पद्धत, पाठवणाऱ्याचे नाव सर्वकाही अगदी खरं वाटतं. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी पाठवलेले एसएमएस आणि बँकेने पाठवलेले एसएमएस यातील फरक ओळखणं फार कठीण होतं.

प्रीमियम लूक अन् भन्नाट फीचर्स… Sony च्या नव्या 5G स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, फीचर्स एकदा पाहाच

अलीकडेच, दिल्ली विद्यापीठातील वित्त विषयाचे प्रोफेसर आणि SEBI नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार असलेल्या प्रोफेसर विन्नी अरोरा यांनी लोकांना सावध करण्यासाठी त्यांच्या @moneyvsme या इंस्टाग्राम प्रोफाईलवर याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

1909 वरून एसएमएसमधील हेडरची माहिती मिळवा

बँकेच्या नावाने आलेल्या एसएमएसमधील सेंडरचे हेडर कॉपी करा आणि 1909 सुविधेच्या मदतीने त्यांची संपूर्ण माहिती तपासा. यासाठी डिटेल्स ऑफ [हेडर] फॉर्मेटचा वापर केला जाऊ शकता. यानंतर तुम्हाला माहिती मिळणार आहे की, एसएमएसमधील हेडर नोंदणीकृत आहे की नाही. पण, 1909 सेवा प्रामुख्याने अवांछित व्यावसायिक संदेशांची तक्रार आणि नोंद करण्यासाठी आहे. त्यामुळे केवळ 1909 वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे एसएमएस खरंच बँकेकडून आला आहे असे मानून त्याच्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही.

ट्राय हेडर पोर्टलचा वापर करा

दुसरी पद्धत म्हणजेच ट्रायचे एसएमएस हेडर माहिती पोर्टल वापरणं. smsheader.trai.gov.in या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही सेंडर हेडरची माहिती मिळवू शकता. या वेबसाईटवरून तुम्ही जाणून घेऊ शकता की, व्यावसायिक किंवा सरकारी जनजागृती संदेशामागील संस्था कोण आहे आणि हेडर नोंदणीकृत आहे की नाही. जर बँकेच्या नावाने आलेला हा एसएमएस अशा एखाद्या हेडरने पाठवला असेल जो नोंदणीकृत नाही किंवा बँकेशी संबंधित नाही, तर हा संदेश बनावट असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.

सेंडरचे नाव बारकाईने तपासा

ट्रायच्या नियमांनुसार, एसएमएस हेडरमध्ये मोठ्या आणि छोट्या अक्षरांचा फरक असतो. त्यामुळे केवळ एक अक्षर बदलले तरी देखील सेंडर बदलू शकतो. सायबर गुन्हेगार अशाच प्रकारच्या दिसणाऱ्या अक्षरांचा वापर करतात आणि खोटे एसएमएस तयार करतात, ज्याच्या मदतीने सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाऊ शकते.

देशी टेक कंपनीचा धमाका! नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनने वेधले यूजर्सचं लक्ष; 6,000mAh बॅटरीसह मिळणार हे दमदार फीचर्स

लिंकवर क्लिक करू नका

एसएमएस किंवा ईमेलमध्ये असलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँक डिटेल्स कोणासोबत शेअर करू नका. एखाद्या व्यवहाराबाबत तुम्हाला काही शंका असेल, तर एसएमएसमध्ये दिलेल्या लिंकचा किंवा क्रमांकाचा वापर करण्याऐवजी, बँकेचे अधिकृत मोबाइल ॲप स्वतः उघडा किंवा बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

Web Title: Bank sms real or fake how to check sender header using trai 1909 service know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक
1

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात
2

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
3

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
4

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.