
Tech Tips: स्क्रीन प्रोटेक्टर न वापरता कसा सुरक्षित ठेवाल स्मार्टफोनचा डिस्प्ले? या आहेत सोप्या टिप्स
फोनच्या स्क्रीनवरील स्क्रॅच सहसा खिशात ठेवलेल्या वस्तूंमुळे येते. चावी,नाणी किंवा कोणत्याही छोट्या वस्तूंमुळे फोनच्या स्क्रीनवर स्क्रॅच येऊ शकते. यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, फोनला खिशात ठेवण्यापूर्वी खिशातील सर्व वस्तू बाहेर काढा आणि खिसा रिकामा करा. विशेषत: ज्या खिशात आधीपासूनच चावी, नाणी किंवा इतर धारदार वस्तू आहेत, अशा खिशात फोन ठेऊ नका. (फोटो सौजन्य – AI Created)
अनेकजण फोनला टेबलवर ठेवताना स्क्रीनच्या बाजूने ठेवतात. जर टेबलवर धूळ, रेती, मातीचे कण किंवा घाण असेल तर फोन ठेवताना आणि उचलताना स्क्रीनवर माइक्रो स्क्रॅच पडू शकतात. त्यामुळे फोनला टेबलवर ठेवताना काळजी घ्या, अन्यथा स्क्रीनचे नुकसान होऊ शकते.
रेती आणि मातीचे अत्यंत छोटे कण देखील स्मार्टफोनच्या स्क्रीनला नुकसान पोहोचण्याचे काम करू शकतात. त्यामुळे समुद्र किनारी, धूळ असलेल्या ठिकाणी फोनचा वापर करताना काळजी घ्या. फोनला पुसण्यापूर्वी किंवा स्वच्छ करण्यापूर्वी स्क्रीनवरील धूळ हळूवारपणे फुंकर मारून हटवा. असे न करता जर थेट कपड्याने जोरात स्मार्टफोनची स्क्रीन साफ केली तर स्क्रीनला नुकसान पोहोचू शकते.
स्मार्टफोनची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी टिश्यू, पेपर किंवा खरखरीत कापडाऐवजी माइक्रोफाइबर कापडाचा वापर करा. याच्या मदतीने तुम्ही स्क्रीनवरील धूळ आणि बोटांचे ठसे अगदी व्यवस्थित स्वच्छ करू शकता. नेहमी लक्षात ठेवा की, डिस्प्ले स्वच्छ करताना स्क्रीनवर जास्त जोर देऊ नका, यामुळे स्मार्टफोनला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते.
जर तुम्ही फोन बॅगेत किंवा पर्समध्ये ठेवत असाल तर बॅगेतील इतर सामान असेच ठेऊ नका. चार्जर, पेन, चावी किंवा दुसऱ्या वस्तूंमुळे स्मार्टफोनच्या स्क्रीनला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे फोन बॅगेतील वेगळ्या कप्प्यात ठेवा. कोणतीही धारदार वस्तू स्मार्टफोनच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्या.
स्मार्टफोनसाठी चांगल्या कव्हरची निवड करणं अतिशय गरजेचे आहे. असे कव्हर निवडा, ज्याचे कोपरे स्क्रीनपेक्षा थोडे उंच असतील. जर फोन चुकून स्क्रीनच्या बाजूने खाली पडला, तर या कोपऱ्यांमुळे डिस्प्ले थेट जमिनीवर आदळण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.