
Belkin New Earbuds 2026: छोटा पॅकेट बडा धमाका!! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Belkin Noise Cancelling Earbuds: जगातला सगळ्यात मोठा टेक शो IFA 2026 सध्या बर्लिनमध्ये जोरात सुरू आहे. सगळ्या मोठ्या कंपन्या आपले नवीन प्रोडक्ट दाखवत आहेत. अशातच Belkin कंपनीने पण आपले तीन नवीन ऑडिओ प्रोडक्ट लॉन्च केले आहेत. Belkin ने आपल्या SoundForm सिरीजमध्ये तीन नवीन मॉडेल आणले आहेत. यांची नावं आहेत.SoundForm Isolate Buds, SoundForm Dot आणि SoundForm Play. चला एक करून बघूया काय आहे यात खास.
याआधी Belkin चा Isolate नावाचा हेडफोन होता जो डोक्यावर घालायचा होता. तसाच अनुभव आता कंपनीने छोट्या इयरबड्समध्ये आणला आहे. हेच या लॉन्चमधलं सगळ्यात मुख्य प्रोडक्ट आहे. यात सगळ्यात भारी फीचर आहे 45dB पर्यंतचं Hybrid Active Noise Cancellation म्हणजे ANC. ANC म्हणजे बाहेरचा आवाज बंद करून टाकतो. 45dB खूप जास्त Anker चा Liberty 4 NC जो यापेक्षा महाग आहे.तो फक्त 30 ते 37dB चं ANC देतो. त्यामुळे या किमतीत 45dB देणं म्हणजे भारीच आहे. Belkin New Earbuds 2026:
याशिवाय यात ३२ तासांची बॅटरी लाईफ मिळते. Bluetooth Multipoint म्हणजे एकाच वेळी दोन डिव्हाईसला कनेक्ट करू शकता. IPX5 रेटिंग आहे म्हणजे घाम आणि पाण्याचे थेंब उडाले तरी खराब होणार नाही. कॉलसाठी Clear Call टेक्नॉलॉजी पण दिली आहे.आणि सगळ्यात भारी म्हणजे फक्त १० मिनिट चार्ज करून ९० मिनिट गाणं ऐकू शकता. बॉक्समध्ये तीन वेगवेगळ्या साईजच्या इयर-टिप्स आणि विंग-टिप्स पण मिळतात जेणेकरून कानात एकदम फिट बसेल.
SoundForm Dot. हा दोन प्रकारात येतो, एक ANC वाला आणि एक ANC नसलेला. साहजिकच ANC वाल्याची किंमत थोडी जास्त आहे. बाकी दोन्हीमध्ये काहीच फरक नाही.यात ३० तासांची बॅटरी, Bluetooth Multipoint, Clear Call आणि IPX5 वॉटर रेझिस्टन्स मिळतं. यात पण तीन साईजच्या टिप्स आणि फास्ट चार्जिंग मिळतं. ज्यांना कमी बजेटमध्ये चांगले बड्स हवे आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
तिसरा प्रोडक्ट थोडा वेगळा आहे. याचं नाव आहे SoundForm Play. हा खास ५ वर्ष आणि त्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी बनवला आहे.यात दोन एकदम खास फीचर आहेत. पहिलं आहे Safe Sound लिमिटर. हे काय करतं तर आवाज 85dB च्या वर जाऊच देत नाही. त्यामुळे मुलांच्या कानाला त्रास होणार नाही. पालकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे.
दुसरं फीचर आहे Focus Boost. यात काही खास साऊंड आहेत जसे की समुद्राच्या लाटांचा आवाज, Brain Beats आणि Pink Noise. कंपनी सांगते की जेव्हा मुलं अभ्यास करत असतील, होमवर्क किंवा वाचन करत असतील तेव्हा हे साऊंड लावले तर त्यांचं लक्ष लागतं.यात Rockstar Mode पण आहे.
ज्याने एकाच गाणं दोन हेडफोनवर ऐकता येतं. बॅटरी पण खूप मोठी आहे. ANC बंद असेल तर ६२ तास चालतो आणि ANC चालू असेल तर ४५ तास. यात माइक पण आहे आणि ३.५mm चा वायर लावून पण वापरता येतो.किंमत आणि कधी मिळणार? Belkin ची नेहमीच खासियत असते की कमी किमतीत चांगली क्वालिटी द्यायची. Isolate Buds सगळ्यात महाग आहे, त्याची किंमत 59.99 डॉलर म्हणजे भारतात जवळपास ५००० रुपये असेल. Play ची किंमत 49.99 डॉलर आणि Dot ची किंमत फक्त 34.99 डॉलर पासून सुरू होते. ANC वाला Dot 39.99 डॉलरला मिळेल.हे तिन्ही प्रोडक्ट या महिन्यापासून Belkin च्या वेबसाईटवर, Amazon वर आणि काही ठराविक दुकानांमध्ये मिळायला सुरुवात होईल.