
पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच... सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये
Tech Tips: Airplane मोड की DND? कोण वाचवतं स्मार्टफोनची सर्वाधिक बॅटरी? जाणून घ्या सविस्तर
बोट स्लेजर एस 100 ची किंमत भारतात 799 रुपये ठेवण्यात आली आहे. तर बोट स्लेजर के 100 + 6-इन-1 ग्रूमिंग किट 1,799 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच स्लेजर के100 प्रो दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. स्टँडसोबत उपलब्ध असणाऱ्या मॉडेलची किंमत 2,999 रुपये ठेवली आहे. तर ट्रॅवल किट बंडलसह उपलब्ध असणाऱ्या मॉडेलची किंमत 3,299 रुपये ठेवली आहे. कंपनीने लाँच केलेले नवीन ग्रूमिंग प्रोडक्ट्स बोटची अधिकृत वेबसाईट आणि देशभरातील पार्टनर रिटेल आउटलेट्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – boAt)
बोट स्लेजर एस 100 एक एंट्री-लेवल ग्रूमिंग ट्रिमर आहे, जे रोजच्या जीवनातील वापरासाठी डिझाईन करण्यात आले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, एका सिंगल चार्जवर हे 300 मिनिटांपर्यंत चालते. तसेच यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे डिव्हाईस केवळ 5 मिनिटे चार्ज केल्यास पूर्ण ट्रिम केले जाऊ शकते. तर 20 मिनिटे चार्ज केल्यास हे डिव्हाईस सुमारे एका महिन्याची बॅटरी लाईफ ऑफर करते. या ट्रिमरमरध्ये स्टेनलेस स्टील ब्लेड्स, एडजस्टेबल कॉम्ब्स आणि वाशेबल अटॅचमेंट्स मिळणार आहेत. हे डिव्हाईस यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करते. बोट स्लेजर एस 100 च्या खरेदीवर 24 महिन्यांची वॉरंटी ऑफर केली जाते.
बोट स्लेजर के 100+ एक 6-इन-1 ग्रूमिंग सेटअप आहे. यामध्ये बियर्ड, हेयर, नोज आणि बॉडी ग्रूमिंगसाठी तीन इंटरचेंजेबल ब्लेड्स देण्यात आले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे डिव्हाईस 200 मिनिटांपर्यंतची बॅटरी लाईफ ऑफर करते आणि यामध्ये सिरेमिक ब्लेड्स, एक प्रीमियम एल्युमिनियम बॉडी आणि IPX6 वॉटर रेजिस्टेंस मिळणार आहे. यासोबतच यामध्ये इसमें एडजस्टेबल कॉम्ब्स, एक मॅग्नेटिक अटॅचमेंट सिस्टिम, बॅटरी लेवल इंडिकेटर आणि ट्रॅवल लॉक फीचरचा देखील समावेश आहे.
बोटचे स्लेजर के 100 प्रो एक 15-इन-1 ग्रूमिंग सॉल्यूशन आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, के 100 प्रो सिरेमिक ब्लेड्स, एल्युमिनियम कंस्ट्रक्शन, IPX6 वॉटर रेजिस्टेंस, एडजस्टेबल कॉम्ब्स, मॅग्नेटिक अटॅचमेंट मॅकेनिज्म आणि 200 मिनिटांचा रनटाइम अशा फीचर्सने सुसज्ज आहे. तुमच्या ग्रूमिंगच्या गरजेनुसार बदलता येणाऱ्या अटॅचमेंट्सची विस्तृत श्रेणी हे याचे वैशिष्ट्य आहे. स्लेझर के 100 प्रो सोबत एक पर्यायी ट्रॅव्हल केस मिळते आणि ते यूएसबी टाइप-सी चार्जिंगलाही सपोर्ट करते.
Ans: boAt हा भारतातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे.
Ans: boAt ची स्थापना 2016 मध्ये अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी केली.
Ans: boAt इयरबड्स, हेडफोन्स, ब्लूटूथ स्पीकर्स, स्मार्टवॉच, चार्जर्स, केबल्स आणि इतर ऑडिओ अॅक्सेसरीज तयार करते.